नागपूर :- पोलीस ठाणे यशोधरानगर हद्दीत, राहणाऱ्या ५० वर्षीय फिर्यादी यांची २७ वर्षीय मुलीचे आरोपी शहबाज उर्फ समीर फैतुल्ला शेख वय २७ वर्ष रा. शांतीनगर, नागपूर याने सोबत मागील चार ते पाच वर्षा पासुन ओळखी व आपसात प्रेम संबंध होते. आरोपीने दिनांक, २४.०२.२०२४ रोजी ०१.३० वा. चे सुमारास फिर्यादीचे मूली सोबत पोलीस ठाणे कळमणा हहीत भांडण करून तिला हातबुक्कीने व पायाने मारहाण केली होती. त्यामुळे ती जखमी झाल्याने आरोपीने तिला वस्तीतील डॉक्टर कडे उपचाराकरीता नेले होते. परंतु फिर्यादीचे मुलीला जास्त दुखापत असल्याने तेथील डॉक्टरांनी दुसऱ्या हॉस्पीटल मध्ये उपचार करण्यास सांगीतले, परंतु आरोपीने दुसऱ्या दवाखान्यात तिला न नेता फिर्यादीचे मुलीस त्याच अवस्थेत फिर्यादीचे घरी आणून सोडले, फिर्यादीने जखमी मुलीला मेडीकल हॉस्पीटल येथे उपचारकामी दाखल केले असता तेथे उपचारादरम्यान फिर्यादीचे मुलीस दि. ०६.०३.२०२४ रोजी डाक्टरांनी तपासुन मृत घोषीत केले. यातील आरोपीस फिर्यादीची मुलगी ही जास्त आजारी आहे असे माहित असतांना सुध्दा आरोपीने फिर्यादीचे मुलीस उपचाराकरीता न नेता फिर्यादीचे घरी आणून सोडले ज्यामुळे उपचारास उशीर होवुन मुलगी मरण पावली.
याप्रकरणी सुरूवातीला मर्ग दाखल करण्यात आला होता सदर मर्ग चौकशीवरून व फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे कळमणा येथे सपोनि, गव्हाणे यांनी आरोपीविरूध्द कलम ३०४ भा.द.वि. अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.