नागपूर :- पोलीस ठाणे वाठोडा हद्दीत पॉट नं. ११३, माँ अन्नपुर्णा सोसायटी, वैष्णो देवी नगर, वाठोडा, नागपूर येथे राहणारे फिर्यादी अजय दशरथ निमजे, वय ३९ वर्ष, यांनी त्यांची होन्डा अॅक्टीव्हा गाडी क. एम.एच ४९ वि.एफ ५६२० किंमती २५,०००/- रू नी ही परा समोर पार्क करून लॉक करून ठेवली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीची गाडी चोरून नेली. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे वाठोडा येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०३(२) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हयाचे समांतर तपासात गुन्हेशाखा युनिट क. ३ चे अधिकारी व अंमलदार ययां मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून सापळा रचुन आरोपी फैयाज मोहम्मद एजाज अंसारी, वय २२ वर्षे, रा. गंगाबाग, पारडी, नागपूर यास ताब्यात घेवुन विचारपूस केली असता, त्याने वर नमुद गुन्हा त्याचे साथिदार तिन विधीसंघर्षग्रस्त बालक यांचे सोबत संगणमत करून केल्याची कबुली दिली, तसेच आरोपीस सखोल विचारपूस केली असता त्यांनी नागपूर ग्रामीण हद्दीत पोलीस ठाणे उमरेड हद्दीतुन वाहन चोरी केल्याचे सांगीतले. आरोपीचे ताब्यातुन दोन दुचाकी वाहन, एक अॅव्हीएटर गाडी क. एम.एच ४० बि.एम २९५९, तसेच एक होन्डा अॅक्टीव्हा गाडी क. एम.एच ४९ बि.एफ ५६२० असा एकुण किंमती अंदाजे १,००,०००/- रू चा मुद्देमाल जप्त करून आरोपी क. १ व एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांना मुद्देमालासह पुढील तपासकामी वाठोडा पोलीसांचे ताब्यात दिले आहे. तसेच दोन विधीसंघर्षग्रस्त बालक यांना पोलीस ठाणे उमरेड पोलीसांचे ताब्यात दिले.
वरील कामगिरी पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली, पोनि, मुकुंद ठाकरे, पोउपनि, काठोके, सफी, दशरथ मिश्रा, सतिश पांडे पोहवा. विजय श्रीवास, सतोषसिंह ठाकुर, पोअं. दिपक लाकडे, दिपक दासरवार, जितेश रेड्डी व प्रमोद देशभ्रतार यांनी केली.