चोरी करणाऱ्या आरोपीस अटक, ६ गुन्हे उघडकीस एकुण ३,००,५००/- रू चा मुद्देमाल जप्त

नागपूर :- फिर्यादी तुषार ज्ञानेश्वर इंगोले, वय ३७ वर्ष, रा. घर नं. ८२८, बोरगाव, गोरेवाडा रोड, नागपूर यांनी पो. ठाणे मानकापूर हहीत, तुषार हार्डवेअर दुकानाचे मागे इंगाले लॉनचे बाजुला त्यांची बोलेरो गाडी क. एम. एच ३१ डी. एस ६०१७  ऊभी करून ठेवली असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे गाडीची एक्साईड कंपनीची बॅटरी किमती अंदाजे १०,०००/- रु ची चोरून नेली. अशा फिर्यादी यांनी दिनांक २५.०२.२०२४ रोजी दिलेल्या तकारीवरून पो. ठाणे मानकापूर येथे अज्ञात आरोपी विरुध्द कलम ३७९ भा.द.वि. अन्वये गुन्हा नोंदविला होता. गुन्हयाच्या समांतर तपासादरम्यान मानकापूर पोलीसांचे अधिकारी व अंमलदार यांनी गोपनीय माहिती व तांत्रिक तपास करून पोलीस ठाणे गिट्टीखदान होत गिट्टीखदान चौक, येथे सापळा रचुन आरोपी नामे तेजस उर्फ ओम अंबर रामावत वय २२ वर्ष रा. गंगानगर, झोपडपट्टी, नागपूर यास ताब्यात घेवून विचारापुस केली असता त्याने वर नमूद गुन्हा केल्याचे कबुली दिली. सदर गुन्हयात आरोपीस अटक करून मा. न्यायालयातुन त्याना पि.सी.आर प्राप्त करून त्याचेकडे अधिक विचारपूस केली असता, त्याने पोलीस ठाणे गिट्टीखदान येथील वाहन चोरी, पोलीस ठाणे सदर येथील तिन वाहन चोरीचे गुन्हे, पोलीस ठाणे हुडकेश्वर येथील एक वाहन चोरीचा गुन्हा केल्याचे कबुल केले. आरोपीचे ताब्यातून तिन बॅटरी, १) पेंशन प्रो गाड़ी क. एम.एव. ४९ के ७३१५, २) लेझर गाडी क. एम.एव. ३१ हैं. व्ही ७०६७, ३) पेंशन प्रो गाडी क्र. एम. एच. ४९ ए.जी १३६२, ४) हिरो होन्डा स्प्लेंडर गाडी क. एम. एच. ३१ ई.डी ५५७१, ५) हिरो होन्डा स्प्लेंडर गाडी बिना नंबर प्लेट असलेली, असा एकुण ३,००,५००/- रू या मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास सुरू आहे.

वरील कामगिरी अपर पोलीस आयुक्त साहेव, पोलीस उपआयुक्त (परि क. २), सहा. पोलीस आयुक्त, सदर विभाग, यांचे मार्गदर्शनात वपोनि राजश्री आडे, सपोनि विलास पाटील, पोहवा राजेश बरणे, नापोडं राहुल गवई, पोअं, विपीन रखे, मिलीट नासरे, प्रशांत खंडारे, कैलास मुळे, विक्रमसिंग ठाकुर यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

'माझी शाळा सुंदर शाळा'अभियानात दिल्ली पब्लिक स्कुल कामठी तालुक्यातून प्रथम

Thu Feb 29 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- राज्य शासनातर्फे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजने अंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा ,सुंदर शाळा’अभियान राबविण्यात आली .त्यानुसार सदर अभियानाची केंद्र तालुका आणि जिल्हास्तरावरील मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.तालुकास्तरावर शासकीय शाळा आणि इतर व्यवस्थापनाच्या शाळा(खाजगी )अशा प्रत्येक तालुक्यातून दोन शाळांची निवड करण्यात आली.अशाप्रकारेसदर अभियान अंतर्गत निवड झालेल्या 26 शाळेनुसार कामठी तालुक्यातुन प्रथम क्रमांकावर दोन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights