चोरी करणाऱ्या आरोपींना अटक, ०२ गुन्हे उघडकीस एकूण ४४,८९,०५९ / रू. चा मुद्देमाल जप्त.

नागपूर :-  पोलीस ठाणे यशोधरानगर हद्दीत संतोष प्रभाकर यांचे यदव नगर, जयस्वाल हॉटेलचे लाईनमध्ये जेसीबी मशीनचे साहीत्य ठेवण्याचे चारही बाजुने भिंत व गेट असलेले मोकळे गोडावून आहे. फिर्यादी हे त्यांचे गोडावून च्यां गेट ला कुलूप लावून घरी गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे गोडावूनमध्ये प्रवेश करून, गोडावूनमध्ये ठेवलेले ग्रीस चे चक्रेट, व जेसीबी मशीनचे लोखंडी साहीत्य किमती ३,४६, ४१३/- चा मुद्देमाल चोरून नेला. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पो. ठाणे यशोधरानगर येथे अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ३७९ भादवि अन्वये गुन्हा नोंद होता.

सदर गुन्हयाचे समांतर तपासात गुन्हे शाखा युनिट ५ चे अधिकारी व अमलदार यांनी मिळालेल्या खात्रीशिर माहीतीवरून सापडा रचुन आरोपी १) मुस्तफा आतीर अन्सारी उम्र २९ साल रा. फारूखनगर टेका, प्लॉट नंबर ३६, पो.ठाणे पाचपावली नागपुर, २) तुषार उर्फ प्रांजल विपीन टेंभुर्णे वय २७ वर्ष, महेन्द्रनगर मस्जिदचे मागे ३) मुस्तफा इस अंसारी वय २२ वर्ष रा. पार्वतीनगर झोपडपट्टी, आजरी माजरी वस्ती जवळ पोलीस ठाणे यशोधरा नगर ४) शेख सोहेब खान अजमल खान वय १९ वर्ष रा. पार्वतीनगर झोपडपट्टी व विधीसंगत बालक यांना ताब्यात घेवुन त्यांची विचारपुस केली असता आरोपींनी वर नमुद् गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीचे ताब्यातुन १) ग्रीस बकेट ४३ प्रत्येकी ४६५३६/- रू प्रमाणे एकून २,३३,७४८ / २) मोबुल अलाय ग्रीस वी १ पकेट किमती १०,८५४/रु३) जेसीबी मशीन से टोह प्लेट ३ नग प्रत्येकी १४,११३/- रू प्रमाणे एकून ४२३४१/- चा माल, ४) जेसीबी मशीनची लोखंडी फॉक क्लीप १ किमती ४८,६१६/-रू असा एकून ३,३५,५५९ चा माल गुन्हयात चोरी माल वाहतुकी करीता वापरलेली ५) फोर व्हिलर बोलेरो पीकअप गाडी नवर एमएच – ४० – बीजी – १७२९ किमती ४,५०,०००/-रूची असा एकून ७,८५,५५९/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आरोपींना अटक करण्यात आलेली आहे तसेच,

दुसऱ्या गुन्ह्यात गुन्हे शाखा युनिट क. ०५ चे अधिकारी व अंमलदार यांनी दिनांक १६.०६.२०२३ चे १९.४० वा. चे सुमारास पोलीस ठाणे मानकापूर हद्दीत मानकापूर चौक, पुलाचे खाली एक बाराचाकी ट्रक क्र. एम.एच ४० सि.एम ५०७६ या मध्ये चोरीचा मुरूम भरून गोरेवाडा कडुन जरीपटका येथे जात आहे. अशा मिळालेल्या खात्रीशिर माहीतीवरून तक्रारीवरून सापळा रचुन ट्रकचालक आरोपी १) सुरेश गुप्ता वय २४ वर्ष रा. सिध्दार्थ नगर मच्छी बाजार, वार्ड नंबर ६, बोरींग जवळ महादुला कोराडी नागपूर याला ताब्यात घेवुन त्यांची विचारपुस केली असता, आरोपीने मालाचे मालकी हक्का बाबत कोणतेही कागदपत्रे सादर केले नाही. आरोपी १) व ट्रक मालक आरोपी क. २) सब्बीर शेख रा. कोराडी मंदीर जवळ नागपूर यांनी संगणमत करून स्वतःचे आर्थिक फायदया करीता सरकारी मालमत्ता मूरूम चोरी करून वाहतुक करीत असता समक्ष मिळुन आल्याने आरोपींना ताब्यात घेतले आरोपींचे ताब्यातुन १) १२ चक्का ट्रक क्रमांक एम एच ४०-सी एम-५०७६ किमती ३७,००,०००/- रू २) मुरूम ची किमती ३५०० /- रू असा एकुन ३७,०३,५०० /- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आरोपींना अटक करण्यात आलेली आहे..

गुन्हे शाखा युनिट क. ०५ चे अधिकारी व अंमलदार यांनी पोलीस ठाणे यशोधरानगर व मानकापूर येथील चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणुन ६ आरोपीस अटक व एक विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेवुन आरोपींचे ताब्यातुन एकुण ४४,८९,०५९ /- रू चा मुद्देमाल जप्त केलेला आहे..

वरील दोन्ही कामगिरी  अपर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा  संजय पाटील, पोलीस उप-आयुक्त (डिटेक्शन) मुम्मका सुदर्शन, यांचे मार्गदर्शना खाली वपोनि सारीन दुर्गे, सपोनि भोपाळे, महामुनी, आशिष कोहळे, सफौ राजेश लोही, पोहवा रामचन्द्र कोरमोरे, भिमराव बांबल, गौतम रंगारी, प्रमोद वाघ, महादेव थोटे, राजुसिंग राठोड नापोअ टप्पुलाल चुटे, राजु टाकळकर, राजेन्द्र टाकळीकर, सुशिल श्रीवास, सुशिल गवई, निखील जामगडे, पोअ विशाल नागभीडे, सुधिर तिवारी, सवीन चव्हान, आशिस पवार यांनी केली..

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

घरफोडी व वाहन चोरी करणारे आरोपी जेरबंद, पाच गुन्हे उघडकीस, एकुण ५,६५,०००/- रू चा मुद्देमाल जप्त.

Mon Jun 19 , 2023
नागपूर :- पोलीस ठाणे पाचपावली प्लॉट नं. ८६०, बुद्धनगर, चंद्रमनी बुद्ध विहार जवळ लांजेवार चे घरी किरायाने राहणारे फिर्यादी सुनिल भिमराव ताकसादे वय ५० वर्ष पो.ठाणे पाचपावली, नागपुर हे घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराचे खिडकीचे दार उघडून आत प्रवेश करून सोन्या चांदीचे दागिने व लॅपटॉप, एल.सी.डी. तसेच रोख १,००,०००/- रु. असा एकुण २,८०,०००/- रू चा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com