रनाळा येथे भव्य निशुल्क आरोग्य शिबिर संपन्न

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :– ग्राम पंचायत रनाळा ,झेन हॉस्पिटल रनाळा युवा चेतना मंच व दिव्यांग फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विठ्ठल रूक्मीणी मंदीर रनाळा येथे भव्य निशुल्क आरोग्य शिबिर संपन्न झाले. याप्रसंगी निशुल्क ह्दयाची ईसीजी,मधुमेह, ब्लड प्रेशर , हिमोग्लोबीन, दंत ,डोळे तपासणी करण्यात आली. सोबतच विविध आजाराची तपासणी करूण उपलब्ध असलेली औषधाचे वाटप करण्यात आले .याप्रसंगी डॉ आशिष वाजपेयी, डॉ सोपान बघे , डॉ राजेश बघे, डॉ निखिल अग्निहोत्री,डॉ अरूणीमा पानसे, राईस आप्टीकल रनाळा यांनी रग्नाची तपासणी केली. जवळपास ५०० रग्णानी या शिबिराचा लाभ घेतला. शिबिराच्या यशस्वीतेकरीता सरपंच पंकज साबळे , ग्रामपंचायत सदस्य व दिव्यागं फाऊंडेशन अध्यक्ष प्रदीप (बाल्या)सपाटे, युवा चेतना मंचचे प्रा पराग सपाटे, बाँबी महेंद्र , कामरान जाफरी,अमोल नागपुरे, अक्षय खोपे, शेषराव अढाऊ, नरेश टोहणे,नरेश सोरते मुकेश बडगे, ग्रामपंचायत सदस्य अरविंद डोगरे, इंदू सिद्धार्थ पाटील, अस्मिता भोयर,सुनीता नांदेश्वर,स्वप्निल फुकटे, मयूर गणेर, आदीनी सहकार्य केले.

NewsToday24x7

Next Post

मनाई असूनही वाहनावर पोलीस लोगोचा सर्रास वापर

Sun May 21 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – दुसऱ्याला देतो….अन दिव्याखाली अंधार… कामठी :- गुन्हेगारांचा शोध घेताना कुठल्याची प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये तसेच गुन्हे घडल्यानंतर गुन्हेगारांना पसार होण्यासाठी मदत होऊ नये यासाठी सक्त पावले उचलत कुठल्याही खासगी दुचाकी व चारचाकी वाहणावर ‘पोलीस’शब्द अथवा वाहतूक शाखेच्या लोगोचा वापर करण्याबाबत सरकारने मनाई केली आहे .असे जरी असले तरी शहरात धावणाऱ्या काही खासगी वाहनावर ‘पोलीस’हा […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com