मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई :- ‘अंत्योदय’ संकल्पनेचे जनक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘अंत्योदय’ दिनाच्याही शुभेच्छा दिल्या आहेत.

नंदनवन निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ‘पंडित दीनदयाळ यांनी अंत्योदय संकल्पना मांडून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहचविण्याचा ध्यास घेतला. त्यांचा हा ध्यास पूर्ण करण्यासाठी आपण एकजुटीने काम करूया, हेच त्यांना जयंतीनिमित्त अभिवादन ‘, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

 

 

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com