नागपूर :- पोलीस ठाणे वाडी हद्दीत वाडी टि-पॉईन्ट, भारत पेट्रोल पंप जवळील, ईलेक्ट्रीक डि.पी ला लागलेले जनरेटर किंमती अंदाजे ३,११,१६३/- रू. वे है कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले, याप्रकरणी फिर्यादी पवन दयाराम सेलोकर वय ३८ वर्ष रा. प्लॉट नं. ५. शिवतिर्थ नगर, बेलतरोडी, नागपूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे वाडी येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०३(२) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हयाचे तपासात वाडी पोलीसांचे तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून व तांत्रीक तपास करून आरोपी नामे १) पियुष मानिकराव रक्षक, वय २८ वर्षे, रा. राम नगरी, सिम्बायोसिस कॉलेज जवळ, वाठोडा, नागपूर २) सुनिल महेश गोंड, वय ३८ वर्षे, प्लॉट नं. ५१, कोहळे ले आऊट, वाडी, नागपुर यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता, त्यांनी वर नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपींचे ताब्यातुन जनरेटर, तसेच जनरेटर उचलण्याकरिता वापरलेली केन क. एम. एच. ४० सि.एक्स. ०६१८ व टाटा एस वाहन क. एम. एच. २७, वि. एक्स ४६८९ असा एकुण किंमती अंदाजे २८,११,१६३/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींना २४ तासाचे आंत अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.
वरील कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपूर शहर, निसार तांबोळी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, शिवाजीराव राठोड, अपर पोलीस आयुक्त (दक्षिण विभाग) नागपूर शहर, लोहीत मतानी, पोलीस उप आयुक्त (परि. क. १), सहा. पोलीस आयुक्त सतीशकुमार गुरव (वाडी विभाग) यांचे मार्गदर्शनाखाली, वपोनि, राजेश तटकरे, पोनि. एस. वि. देशमुख, सपोनि, राहुल सावंत, पोहवा. तुलसीदास शुक्ला, नापोअं, अजय पाटील, दुर्गादास माकडे, सोमेश्वर वर्षे व राहुल बोटरे यांनी केली.