नागपूर :-आशिष सुधाकरराव कोवळे, वय ३९ वर्ष रा. प्लॉट क्र. ०५. शिवदर्शन अपार्टमेंट, पटेल नगर, काटोल रोड, नागपूर यांनी भागीदारी तत्वावर पो. ठाणे बजाजनगर हददीत बजाजनगर चौकात द कॉमन ग्राउंड स्पोर्टस कॅफे अॅण्ड रेस्ट्रो नावाचे हॉटेल सन २०२० मध्ये सुरू केले. सदर हॉटेल पाहण्याकरीता व हॉटेलचे स्टॉफवर नजर ठेवणेकरीता फिर्यादी व त्याचे पार्टनर यांनी आरोपी अर्जुन प्रदीप जयस्वाल वय ३१ वर्ग रा. प्लॉट नं. १/७ रिमझीम निवास, उज्वल नगर, सोमलवाडा याला हॉटेजचा मॅनेजर म्हणून कामावर ठेवले. तो हॉटेलचे मार्केटींगचे कामे, पैश्याचा व्यवहार करीत होता. महिन्याच्या शेवटी पूर्ण हिशोब देत होता. सन २०२२ मध्ये त्याने हॉटेलचे स्टॉफला शिवीगाळ करणे विनाकारण वाद घालून स्टॉफला पैसे न देणे असे सुरू केले. याबाबत फिर्यादी यांनी त्यास विचारणा केली असता त्यांने फिर्यादी सोबत सुद्धा वाद घातला. त्यामुळे फिर्यादी यांनी त्याला दि. २०.१०.२०२२ रोजी नौकरीवरून काढून टाकले होते.
काही दिवसांनी फिर्यादी यांना माहिती मिळाली की, आरोपी अर्जुन जयस्वाल याने दि. ०१.०८.२०२२ रोजी इंडस बँक, नागपूर येथे द कॉमन ग्राउंड स्पोर्टस कॅफे अॅण्ड रेस्ट्रो नावाचे बनावट खाते उघडले. सदर खाते उघडण्याकरीता त्याने बनावट फुड लायसन्स व गुमास्ता बनवून ते बँकेत जमा केले आहे. त्याचप्रमाणे झोमॅटो व स्विगी यावर येत असलेले ग्राहकांच्या खाण्याचे पदार्थाचे ऑर्डरचे पैसे हे फिर्यादीचे परवानगी न घेता त्याने उघडलेले बनावट खात्यात जवळपास २ लाख वळते केले आहे. अशा फिर्यादीच्या रिपोर्टवरून पो. ठाणे बजाजनगर येथे आरोपी अर्जुन जयस्वाल विरुद्ध कलम ३८१ ४२०, ४०६, ४६८, ४७१ भा. दं.वी. या गुन्हा दाखल करण्यात आला होता. बजाजनगर पोलीसांनी गुप्तबातमीदारा मार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून आरोपी हा त्याचे फिरंगीश स्कायलाई अजनी, नागपूर या हॉटेलमध्ये हजर असल्याचे माहिती झाले वरून आरोपीस ताब्यात घेतले. आरोपीस सदर गुन्हयाबाबत विचारपूस केली असता सदर आरोपीने नमूद गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीला गुन्हयात अटक करण्यात आली. आरोपीचे ताब्यातून आरोपीने गुन्हयात वळती केलेल्या रक्कमेपैकी रु. १,७६०८१/- रु नगद जप्त करण्यात आले.
वरील कामगीरी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ क्र. १, सहाय्यक पोलीस आयुक्त, सोनेगाव विभाग यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विठदलसिंग राजपूत, पोलीस निरीक्षक (गुन्हे), प्रविण पांडे, पोउपनि प्रमोद पारखी, नापोअ, रितेश मलगुलवार, पोअ शेरसिंग राठोड, अभिजीत, निवेश तडसे यांनी केली.