अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणा-या आरोपीस 20 वर्ष सश्रम कारावास व एक लाख रुपये द्रव्यदंडाची शिक्षा 

– गडचिरोली येथील मा. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचा न्यायानिर्णय.

गडचिरोली :- सविस्तर वृत्त असे आहे की, पोलीस ठाणे गडचिरोली हद्दीतील मौजा दर्शनीमाल गावात दि. 30/05/ 2018 रोजी फिर्यादी यांची पीडीत मुलगी ही आपले घरुन दुपारी 03.00 वाजताचे सुमारास घराशेजारी असलेल्या बाथरुममध्ये जाउन घरी येत असतांना, पीडीताचे आजोबा यांचे घराचे जवळ असलेल्या गोठयाचे चाफ्यामध्ये यातील आरोपी  अनिल कवडु मशाखेत्री वय 40 वर्ष रा. दर्शनीमाल याने लपुन बसुन पीडीता अल्पवयीन असल्याचे माहीत असुन ती घराकडे परत जात असतांना, पीडीतेच्या जवळ येउन, हात पकडुन व एक हात तिचे तोंडावर दाबुन, ओढत-ओढत जवळ असलेल्या घराच्या धाब्यावर नेउन पीडीताचे अंगावरील कपडे काढुन जबरी संभोग केला. त्यामुळे पिडीता ही बेशुध्द पडल्याने, आरोपीने तीला गोठयाजवळ असलेल्या संडासमध्ये डांबुन ठेवले. पीडीता ही घरी न आल्याने फिर्यादीने गावात व इतरत्र पीडीतेचा शोध घेतला असता मिळुन आली नाही. रात्री अंदाजे 08.30 वा. दरम्यान फिर्यादीचा लहान मुलगा हा सायकल ठेवण्यासाठी घराजवळ असलेल्या गोठयामध्ये गेला असता. गोठयाजवळ असलेल्या संडासमध्ये त्याला पीडीतेची पांढ-या रंगाची ओढनी दरवाज्यातुन बाहेर दिसली. सदर बाब ही फिर्यादीला सांगताच तिथे फिर्यादीने जावुन पाहीले असता पीडीता ही बेशुध्द झालेल्या अवस्थेत मिळाली.

अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरुन पोस्टे गडचिरोली येथे दि. 31/05/2018 ला अप क्र. 217/2018 अन्वये कलम 363, 376 (2) (3), व 342 भादवी तसेच कलम 4 बाल लैंगीक अत्याचार अधिनियम, तसेच अनुसुचित जाती जमाती कायदयान्वये गुन्हा दाखल करुन आरोपीस दि. 31/05/ 2018 रोजी अटक करुन, तपास पुर्ण करुन आरोपी विरुध्द सबळ पुरावा मिळुन आल्याने मा. न्यायालयात स्पेशल केस क्र. 28/2018 अन्वये दोषारोप दालख करण्यात आले. फिर्यादी व वैद्यकीय पुरावा, ईतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद मा. न्यायालयाने ग्राह्र धरुन दि. 05/10/ 2023 रोजी आरोपी नामे अनिल कवडु मशाखेत्री वय 45 वर्ष रा. दर्शनीमाल यास मा. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश, उत्तम एम. मुधोळकर गडचिरोली यांनी आरोपीस कलम 363, 376, (2) (3) 342 भादवी तसेच कलम 4 बाल लैंगीक अत्याचार अधिनियम, मध्ये दोषी ठरवुन 20 वर्षे सश्रम कारावास व एक लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. कलम 3 अनुसुचित जाती जमाती कायदायान्वये पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. दंडाची रक्कम पीडीतेला देण्याचा आदेश पारित करण्यात आला.

सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल एस. प्रधान यांनी कामकाज पाहिले तसेच गुन्हाचा तापस एसडीपीओ डॉ. सागर कवडे व मपोउपनि/तेजस्वीनी संपत पाटील गडचिरोली यांनी केला. तसेच संबधीत प्रकरणात साक्षदारांशी समन्वय साधुन प्रकरणाची निर्गती करीता कोर्ट पैरवी अधिकारी व कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महामार्गावरील टेकाडी शिवारात चार ट्रक अवैद्य रेती वाहतुक करताना पकडले

Thu Oct 5 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – कन्हान पोलीसांची अवैद्य रेती तस्करांविरूध्द धडक कारवाई.   कन्हान :- पोलीस स्टेशन हद्दीतुन अवैधरित्या विना परवाना शासनाचा महसुल बुडवुन रेतीची वाहतुक करणाऱ्या तीन १६ चाकी व एक १४ चाकी असे चार नॅशनल परमिट ट्रकना टेकाडी शिवारात नागपुर जबल पुर राष्ट्रीय महामार्गावर कन्हान पोलीसांनी पकडुन ३५ ब्रास रेती व ४ ट्रक असा एकुण १,१६,१०,०००/- रु चा मुद्देमाल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com