खासदार क्रीडा महोत्सव, आफताफ खान, अर्चना नाडर पंजा कुस्तीत चॅम्पियन

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरू असलेल्या पाचव्या खासदार क्रीडा महोत्सवातील पंजा कुस्ती स्पर्धेत आफताफ खान आणि अर्चना नाडर महिला व पुरूष गटातून चॅम्पियन ठरले. रेशीमबाग मैदानात ही स्पर्धा पार पडली. पुरूष गटात आफताबने १०० पेक्षावरील गटात बाजी मारली तर अर्चनाने महिलांच्या ६० किलोवरील गटात जेतेपदावर नाव कोरले.

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री तथा प्रो-पंजा लीगच्या संचालक प्रीती झांगियानी आणि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता, मॉडेल, निर्माता दिग्दर्शक तथा प्रो-पंजा लीगचे संचालक परवीन डबास यांच्या विशेष उपस्थितीत पंजा कुस्ती स्पर्धेचा शुभारंभ झाला. यावेळी आमदार मोहन मते, खासदार क्रीडा महोत्सवाचे सचिव डॉ. पीयूष आंबुलकर, कन्वेनर सचिन माथने, समन्वयक गुड्डू गुप्ता, अरूण कपूरे, प्रमोद वालमांडरे, श्रीकांत वरणकर आदी उपस्थित होते.

निकाल (प्रथम, द्वितीय व तृतीय):

पुरूष

वजनगट – ५० किलो

शेख मोशीम, अजय शेख, अभिषेक दाते

६० किलो

अब्दुल तामिमी, मोहित होले, आनंद खोडे

७० किलो

मिरफराद अली, ऋषिकेश गंगताई, आझम पठाण

८० किलो

काज़ी अब्दुल माझिओ, सैफ खान,अथर्व भागवत

९० किलो

तोहीद शेख, आयुष शर्मा, मंगेश डाफरे

१०० किलो

दारासिंग हंडा, अर्जुन धाटे, आर्यन शुक्ला

+१०० किलो

आफताफ खान, अक्षय गंगोत्री, मोहम्मद ताकी

महिला

वजनगट – ६० किलो

सोनू सरोते, आर्या शेंडे, मोनिका गयकी

+ ६० किलो

अर्चना नाडर, विधी खंडेलवाल, पूजा चंदनखेडे

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

२२ पासुन मनपाची योग शिबीरे सहभागी व्हा,आरोग्याला जपा

Fri Jan 20 , 2023
१४ ठिकाणी ७ दिवसीय शिबीरांचे आयोजन चंद्रपूर  :- राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत आयुष्मान भारत आरोग्यवर्धिनी केंद्र व पतंजली योग समिती – योगनृत्य परीवाराच्या संयुक्त विद्यमाने रोगमुक्त चंद्रपूर अभियानाची सुरवात २२ जानेवारी पासुन शहरात १४ ठिकाणी ७ दिवसीय निःशुल्क योग प्राणायाम व आरोग्य शिबीरांचे आयोजन करण्यापासुन होत आहे. या शिबिरांत सहभागी होऊन आपले आरोग्य जपण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे. निरोगी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights