जिवे ठार मारणाऱ्या आरोपीस अटक

नागपूर :- फिर्यादी हरिओम कमलेश झारीया वय २० वर्ष, रा. प्लॉ नं. ६०७ ओमनगर कोराडी नागपुर, हा त्याचा मित्र श्रेयांश शैलेश पाटील वय २० वर्ष रा. वस्तीनगर गल्ली नं. २०५ बाराखोली, नागपुर, सोबत पोलीस ठाणे जरिपटका हद्दीत एन. आय.टी. गार्डनला बसण्याकरीता पायदळ जात असतांना श्रावस्ती बौध्दविहाराजवळ सार्वजनिक रोडवर आरोपी अमित गणपत मेश्राम वय १९ वर्ष रा. बापुना वाइन शॉपमागे हुडको कॉलनी, जरिपटका नागपुर व त्याचे दोन विधीसंघर्षग्रस्त साथीदार यांनी अॅक्टीवा गाडीवर येवुन फिर्यादीचा मित्र श्रेयांश शैलेश पाटील यास जुने भांडणाबाबत माफी मागण्यास सांगीतले, परंतु श्रेयाश पाटील यांनी माफी न मागीतल्याने आरोपी व त्याचे दोन विधीसंघर्षग्रस्त साथीदार यांनी संगणमत करून लोखड़ी धारदार चाकुने, लोखंडी पाईपने व हाताने मारुन फिर्यादीचा मित्र श्रेयाश शैलेश पाटील वास जिवानिशी ठार मारून पळून गेले.. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या रिपोर्टवरून पोलीस ठाणे जरिपटका येथे सपोनि त्रिपाठी  यांनी आरोपीविरूध्द कलम ३०२, ३४ भादंवी अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी अमित गणपत मेश्राम याना अटक करून दोन्ही विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेवुन पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कुख्यात गुंड गणेश प्रितमलाल बोरकर स्थानबध्द

Fri Jun 30 , 2023
नागपूर :- नागपूर शहराचे पोलीस आयुक्त यांनी दिनांक २९/०६/२०२३ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलीस ठाणे पारडी, कळमना आणि वाठोडा नागपुर च्या हद्दीत शरीराविरूध्द व मालमत्तेविरूध्द गुन्हे करणारा कुख्यात गुंड नामे गणेश प्रितमलाल बोरकर, वय ४० वर्ष रा. गिरजानगर, भांडेवाडी, पारडी, नागपूर यास महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व्हीडीयो पायरेट्स, वाळु तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!