नागपूर :- पोलीस ठाणे एम. आय. डी. सी. हद्दीत राहणारी १६ वर्षीय फिर्यादी मुलगी हिचे आई-वडील बाहेरगावी गेले होते. फिर्यादी ही घरी आपले लहान बहीनीसोबत होती तिथे वस्तीत राहणारा आरोपी जितेंद्र भाऊराव रहांगडाले, वय ३५ वर्षे याने फिर्यादी ही रात्री मला बाथरुमला उठली असता, आरोपीने अचानक फिर्यादीने मागुन येवून तिचा हात पकडुन तिचेशी अश्लील वर्तन केल्याने फिर्यादीने आरडा-ओरड केली तेव्हा आरोपी हा पळून गेला. आरोपीने फिर्यादीचे मनास लज्जा येईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. त्यानंतर सुध्दा आरोपीने फिर्यादीचे घरासमोर येवुन फिर्यादीस ईशारे करून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी फिर्यादी हिने दिलेल्या तक्रारीवरून पो. ठाणे एम. आय. डी. सी. येथे सपोनि घुगल यांनी आरोपीविरुद्ध कलम ३५४ (अ) भादवि सहकलम १२ पोक्सो कायदा अन्यये गुन्हा नोंदवून आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे