उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई टाळण्याकरिता काढला इंटेक विहिरीतील गाळ..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी, ता.१२ : मे महिन्यात भेडसावणाऱ्या पाणीटंचाईने घातलेली भर लक्षात घेऊन ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घेत येरखेडा- रनाळा संयुक्त पाणी पुरवठा योजना अंतर्गत कन्हान नदीवरील गाळेघाट परिसरात असलेल्या इंटेक विहिरीतील गाळ काढून संभाव्य पाणीटंचाईच्या झळांवर घातलेली फुंकर नागरिकांना दिलासा देणारी ठरली आहे.

येरखेडा- रनाळा येथे नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरवठा व्हावा या उद्देशाने मागील काही वर्षांपूर्वी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर यांच्या प्रयत्नाने येरखेडा- रनाळा संयुक्त पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती.

या योजने अंतर्गत कन्हान नदीवरील गाळेघाट परिसरात इंटेक विहीर उभारण्यात आली असून इंटेक विहिरीच्या माध्यमातून पाणी पुरवठा होत असतो. उन्हाळ्याच्या काळात पाण्याची पातळी कमी होऊन इंटेक विहिरीमध्ये गाळ साचून व रेती जमा होऊन पाण्याचे स्त्रोत बंद होतात. परिणामी नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो तसेच नागरिकांना गढूळ पाणी नागरिकांना प्यावे लागत असते. विहिरीत गाळ साचल्याने पाण्याची पातळी खाली गेल्याने ग्रामस्थांना दूषित पाणी प्यावे लागत होते. त्यामुळे पाणीटंचाईचा संभाव्य धोका टाळण्यासाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर यांच्या मार्गदर्शनात ग्रामपंचायत प्रशासनाने इंटेक विहिरीचा गाळ काढण्याचा निर्णय घेतला. व संपूर्ण विहिरीचा गाळ काढून ती स्वच्छ केली. ग्रामपंचायतकडून विहिरीतील गाळ काढून खोलीकरण केल्याने नागरिकांना पाणीटंचाईपासून दिलासा दिला.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com