भिवापूर :- दिनांक १७/०८/२०२४ रोजी पोलीस भिवापूर येथील स्टाफ पोलीस स्टेशन भिवापूर हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारांकडुन माहिती मिळाली की, भिसी हायवे रोडकडुन नांद गावाकडे टिप्पर अवैधरीत्या विनारॉयल्टी जात आहे. अशा मिळालेल्या विश्वसनिय माहिती वरून नमुद घटनास्थळी नाकाबंदी केली असता स्टाफसह नांद रोड सालेभट्टी शिवार येथे १) एम एच ४० सी डी ९९७५ चा चालक शाहरूख रउफ खान वय २८ वर्ष रा हुसैनपुर पोस्ट इदलपुर ता लालगंज जि प्रतापगढ़ (उ. प्र) ह मु हिंगणघाट फाईल बुध्द विहार जवळ पुलगाव जि वर्षा याने आपल्या ताब्यातील वाहनात १० बास रेती अंदाजे कि, ५०००/- रू. प्रमाणे ५०,०००/- रू व एम एच ४० सी डी ९९७५ चा मालक नामे अमोल रमेशराव देशामुख वय ३४ वर्ष रा सर्कस ग्राउंड हिंगणघाट फाईल जवळ पुलगाव ता पुलगाव जि वर्धा याचे सांगणेवरून मोरणा घाट लाखांदुर जि. भंडारा घाटातून भरून आणल्याचे सांगितले. आरोपीकडुन चौदा चक्का ढक टिप्पर क. एम एच ४० सी डी ९९७५ त्यामध्ये १० ब्रास रेती अंदाजे कि, ५००० रू. प्रमाणे ५०,०००/-रू व ट्रक एम एच ४० सी डी ९९७५ ची अंदाजे किंमत ४०,००,०००/- रू असा एकुण किंमत ४०,५०,०००/रू चा मुद्देमाल अवैधरीत्या विनापरवाना वाहतूक करतांना मिळुन आल्याने घटनास्थळावरून जप्त करण्यात आला. आरोपी क्र. ०१ यास अटक करण्यात आली. अवैधरित्या विनापरवाना शासनाचा महसूल बूडवून रेती भरून सार्वजनीक मालमत्तेचे नुकसान करून रेतीची चोरटी वाहतूक करतांना मिळून आल्याने आरोपीतांविरूद्ध कलम ३०३(२), ४९, ३(५) भा. न्याय सहीता ४८ (७), ४८(८) म.ज.महसुल संहिता १९६६. सह. कलम ४, २१ खानी. आणी खनिजे (विकास आणी नियमन) अधि.१९५७ स.क ३. सार्व. मालमत्ता नूकसान प्रति. अधि. १९८४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला असुन पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनात पोस्टे भिवापूर येथील ठाणेदार सपोनि जयप्रकाश निर्मल, सफौ किशोरसिंग ठाकुर, पोहवा राकेश त्रिपाठी यांनी पार पाडली.