नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवार ता. 24) 5 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 70 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे ओम श्री गणेश सागर फास्ट़ फुड, कॉफी हॉऊस चौक, धरमपेठ, नागपूर यांच्यावर किचन वेस्ट लाइनला ड्रेनेज लाइन जोडणी केल्याने आणि हरित न्यायाधिकरण कायद्यांतर्गत डिसल्टिंग चेंबर्स उपलब्ध न झाल्यामुळे अन्न कचऱा ब्लॉक झाल्याबाबत 35 हजार दंड वसूल करण्यात आला.धंतोली झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. कैलाश मिल्क, मनिष नगर, नागपूर या दुकानावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. गांधीबाग झोन अंतर्गत सोमानी नर्सिग होम, आझाद चौक यांच्यावर सामान्य कचऱ्यासह जैव वैद्यकीय कचरा आढळून आल्याने कारवाई करून 15 हजार रुपयांचा दंड वसूल केला. व मे. अंकित किराणा स्टोर्स, महाल मार्केट या दुकानावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. लकडगंज झोन अंतर्गत मे. अदित्य बिल्डर्स, भरत नगर चौक, यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
Next Post
विविध सामाजिक आयोजन करेगा, नागपुर जिला अग्रवाल सम्मेलन
Wed May 24 , 2023
– भास्कर पुरस्कृत सुलेखा लिलडिया का सत्कार नागपुर :- महाराष्ट्र राज्य अग्रवाल सम्मेलन की नागपुर जिला ईकाई के पदाधिकारियों एवं कार्यसमिति सदस्यों की एक सभा प्रांतीय कार्यकारी अध्यक्ष रमाकांत खेतान की प्रमुख उपस्थित में गत 21 मई को नागपुर विभागीय महामंत्री दुर्गाप्रसाद अग्रवाल के निवास पर सम्पन्न हुई। महाराजा अग्रसेन एवं माता माधवी को पुष्पार्पण के पश्चात् नागपुर जिला अध्यक्ष […]

You May Like
-
October 2, 2023
फूल सी कोमल है तू नारी, पर इरादे तेरे फौलादों वाले
-
November 5, 2023
‘पौर्णिमा दिवस’ निमित्त कॉफी हाउस चौकात जनजागृती
-
July 4, 2023
सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अटक
-
September 26, 2023
रेल्वेत चोरी करणारी टोळी गजाआड
-
June 17, 2023
अवैधरीत्या शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीला अटक
-
January 3, 2023
नागरीकांना आता मोफत धान्य मिळणार!