भारताने ‘वेलनेस’ क्षेत्रात जगाला नेतृत्व प्रदान करावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : आज वेलनेस‘ अर्थात निरामय जीवन हा मोठा जागतिक उद्योग झाला आहे. वेलनेस‘ म्हणजे केवळ शारीरिक स्वास्थ्य नसून ते शारीरिकमानसिक व भावनिक संतुलित स्वास्थ्य आहे.  वेलनेसच्या क्षेत्रात भारत पूर्वीपासूनच सामर्थ्यवान असून देशाने या क्षेत्रात जगाला नेतृत्व प्रदान करावे असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

 

   राज्यपाल  कोश्यारी यांच्या हस्ते बुधवारी (दि. १५) राजभवन येथे फिटनेस व वेलनेस उद्योग क्षेत्रातील ४० व्यक्तींना ग्लोबल वेलनेस डे‘ पुरस्कार  प्रदान करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.     

            कार्यक्रमाचे आयोजन डॉ रेखाज झेप फाउंडेशन व वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाला वेलनेस‘ राजदूत रेखा चौधरीचित्रपट निर्मात्या स्मिता ठाकरे व अभिनेते विद्युत जामवाल प्रामुख्याने उपस्थित होते. 

            निरोगी जीवनासाठी केवळ आर्थिक दृष्ट्या संपन्न असणे पुरेसे नाही तर मानसिक स्वास्थ्य देखील विशेष महत्वाचे आहे. आज अमेरिकेत संपन्नता असली तरीही मानसिक अस्वास्थ्यामुळे लहान मुले व युवक बंदुकीच्या मदतीने हिंसाचार करीत असल्याच्या घटना घडत आहेत.

            निरोगी जीवनासाठी योगध्यानधारणाशांतीसंगीत  व संतुष्टी आवश्यक असल्याचे मत राज्यपालांनी व्यक्त केले. या दृष्टीने एकाग्रता व तितिक्षा देखील आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आज योगामुळे जग भारताकडे अपेक्षेने पाहत आहे. त्यामुळे भारताने निरामय जीवन जगण्यासाठी जगाला मार्गदर्शन करावे असे राज्यपालांनी सांगितले.

            राज्यपालांच्या हस्ते यावेळी अभिनेते विद्युत जामवालस्मिता ठाकरेफारुख कबीरसोनाली सेहगलदारासिंह खुराणाआकांक्षा सिंहदर्शन कुमारमानव मंगलानीअब्दुल कादररेणू कांतशिला अय्यर आदींचा सत्कार करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

महालगावा-मुरदाडा अपघात प्रकरण पेटले

Fri Jun 17 , 2022
अमरदिप बडगे पोलिसांना मारण्याचा व पोलिस निरीक्षकांची गावकऱ्यांनी काढली बंधुक व्हिडिओ झाला वायरल गोंदिया :- गोंदिया जिल्ह्याच्या ग्राम महालगाव-मुरदाडा येथे अवैधरित्या वाळू तस्करी करणारा टिप्पर व ट्रॅक्टर यांचा विचित्र अपघात बुधवार, 15 जून रोजी झाला. यात ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले. https://youtube.com/shorts/2KPlAf1sLI8?feature=share असुन त्यापैकी पुन्हा एकाचा मृत्यू झाला. गुरुवार, 16 जून रोजी दूसरा मृतदेह आणून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com