संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- शासनाने गाव तेथे प्रवासी निवारा ही योजना राबविली या योजने अंतर्गत कामठी तालुक्यात खासदार, आमदार निधीतून प्रवासी निवाऱ्याचे बांधकाम करण्यात आले सदर बांधकाम विभागाद्वारे बांधण्यात आलेल्या या निवाऱ्याची देखभाल, दुरुस्ती परिवहन मंडळातर्फे करणे गरजेचे असताना याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे यामुळे सध्या गाव तिथे प्रवासी निवारा या योजनेचा फज्जा उडाला असून कामठी तालुक्यातील प्रवासी निवारे हे कुणाचे सहारे?असाही प्रश्न उभा होऊन ठाकला आहे.
गावात पोहोचत असलेल्या एस टी बस चा प्रवास करणाऱ्या सामान्य नागरिकांना ऊन पावसापासून स्वतःचे संरक्षण व्हावे यासाठी गावा गावात गावफाट्यावर शासनाच्या वतीने प्रवासी निवारे बांधण्यात आले आहेत परंतू त्याचा फायदा प्रवासी साठी होत नसून अतिक्रमित लोकांसह गायम्हैस , बांधण्यासाठी , तर कुणी तर सायकलचे दुकान घातले तर कुणानी आपला निवारा करूनच ठेवला आहे परिणामी प्रवाश्यांना प्रवासी निवारा असल्यावर सुद्धा रोडवर किंवा झाडाच्या सावलीचा सहारा घेऊन वाहनांची ची वाट पहावी लागत आहे .