प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भाजपा प्रदेश कार्यालयात आनंदोत्सव

मुंबई :- अयोध्या येथील भव्य मंदिरात प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात सोमवारी प्रचंड जल्लोषात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. प्रदेश कार्यालयात अयोध्या येथील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण एल ई डी स्क्रीनद्वारे दाखविण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

अयोध्येतील मंदिरात विधिवत प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.मिठाई वाटपही करण्यात आले. यावेळी रामभक्तांनी केलेल्या प्रभू रामचंद्रांच्या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला होता. या आनंदोत्सव कार्यक्रमात भाजपा प्रदेश समन्वयक विश्वास पाठक, ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंह,राज पुरोहित,ज्येष्ठ कार्यकर्त्या शैला पतंगे – सामंत,प्रदेश प्रवक्ते ओमप्रकाश चौहान,प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सुरेश शुक्ल आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या भजनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता.प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मुंबईत आणि राज्यातही अनेक ठिकाणी भाजपा तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

NewsToday24x7

Next Post

सागर कातुर्डे ‘खासदार श्री 2024’,खासदार क्रीडा महोत्सव : पश्चिम भारतस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा

Tue Jan 23 , 2024
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील पश्चिम भारतस्तरीय शरीर सौष्टव स्पर्धेत महाराष्ट्राचा सागर कातुर्डे ‘खासदार श्री 2024’ चा मानकरी ठरला. तर महाराष्ट्राच्या हरमित सिंग ला ‘बेस्ट पोजर’ म्हणून गौरविण्यात आले. रविवारी (ता.21) रात्री फुटाळा तलाव परिसरात झालेल्या स्पर्धेत सागर कातुर्डेने 85 किलो वजनगटात उत्कृष्ट प्रदर्शन केले. या वजनगटात विदर्भाचा आशिष काळसर्पे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com