नागपूर :- तहसिल पोलीसाचे तपास पथक पेट्रोलींग करीत असताना, त्यांना टांगास्टैंड चौक येथे लाल रंगाची टि-शर्ट व जिन्स घातलेला इसम हा शस्त्र घेवुन धूमधाम करीत आहे. अशा मिळालेल्या सुचनेवरून घटनास्थळ गले असता वरील वर्णनाचा इसम दिसल्याने त्यास घेराव टाकून पकडले त्याचे जवळून लोखंडी चाकू ताब्यात घेतला त्यास पोलीस ठाणे येथे आणून नांव, पत्ता विचारले असता, त्याने नीरव मोहनलाल गुप्ता, वय २६ वर्षे, रा. गल्ली नं. ०२, वडे कंपनीजवळ, प्रेम नगर पोलीस ठाणे शांतीनगर असे सांगीतल आरोपी हा नमुद ठिकाणी कोणतातरी हस्तक्षेण गुन्हा करण्याचे उद्देशाने आला असल्याने त्याचे विरुद्ध पोलीस ठाणे तहसिल येथे पोहवा संजय शाहू यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोउपनि मैद यांनी कलम ४, २५ भाहका १३५ मोका अन्य नोंदवून आरोपीस अटक केली आहे.
घातक शस्त्रासह धूमधाम करणाऱ्या आरोपीस अटक
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com