-अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष यांची कारवाई
सावनेर :- अंतर्गत मौजा माही लॉज धापेवाडा पाटणसावंगी रोड सावनेर येथे दिनांक ०७/०९/२०२३ चे १७. १० वा. ते १८.४५ वा. दरम्यान अनैतीक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष ना.ग्रा येथील पोलीस स्टाफ यांना गुप्त बातमीदारांकडुन माहीती मिळाली की, आरोपी नामे १) सुशिल नारायण गजभिये, वय ३२ वर्ष, रा. वार्ड क्र. २ वाघोडा सावनेर २) महेश पांडूरंग निबाळकर वय २६ वर्ष, रा. वार्ड क्र. ३ ब्राम्हणी ता. कळमेश्वर ३) अक्षय बळिराम मनाम वय २४ वर्ष, रा. एमआयडीसी कळमेश्वर ४) राकेशरोशन रामलाल चौधरी वय २८ वर्ष, रा. नईमा ता. तेलहरा जिल्हा नांलदा राज्य बिहार ह. मु. कळमेश्वर ५) धिरज बाबारावजी पाटील, वय २९ वर्ष, रा. येरजा ता. नरखेड ह. मु. सावंगा शिवा पोस्टे कोढाळी ६) मनिष महादेव वाघमारे, वय २७ वर्ष, रा. वार्ड क्र. ३ ब्राम्हणी ता. कळमेश्वर ७) अनुप ज्ञानेश्वर घोटे, वय २४ वर्ष, रा. कोंढा सावंगा वार्ड क्र. २ काटोल नागपूर ८) मॅनेजर विनोद जनधन खुरपडे, वय ३० वर्ष, रा. वार्ड क्र. २ भालेराव शाळेच्या मागे सावनेर हे स्वतःचे आर्थिक फायदयाकरीता मुलींना पैशाचे आमिश देवुन देहव्यापारास प्रवृत्त करून त्यांना ग्राहकांना पुरवून नमुद ठिकाणी येण्यास सांगुन तेथे देह व्यापारास जागा उपलब्ध करून देउन पिडीत मुलींना ग्राहकास पुरवून देहव्यापार करवुन घेतात. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून सदरची माहिती ही मा. पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण यांना देवुन त्यांचे आदेशाने बोगस पंटर पंचनामा कारवाई करून बोगस ग्राहक पाठवून व त्याच्या इशाऱ्या प्रमाणे पोलीस स्टाफसह रेड कारवाई करून आरोपीताना ताब्यात घेण्यात आले. माही लॉज मध्ये एक पिडीत मुलगी व बोगस ग्राहक तसेच दुसऱ्या रूममध्ये आणखी एक पिडीता मिळून आल्याने पिडीतांना विचारपूस केली असता माही लॉजचा मालक सुशिल गजभिये रा. सावनेर यांचे सांगण्यावरून ग्राहकांकडून पैसे देहव्यापार करीत असल्याचे सांगितले.
सदर प्रकरणी सरकार तर्फे फिर्यादी नामे सहायक पोलीस निरीक्षक अजाब कोठीयन नेवारे, नेमणुक आर्थिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण यांचे रिपोर्टवरून पो.स्टे. सावनेर येथे आरोपीतांविरुध्द कलम ३, ४, ५ स्त्रीया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनिमय १९५६ भादवी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. आरोपीतांना अटक करण्यात आली असून गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, पोस्टे सावनेर हे करीत आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक नागपूर (ग्रामीण) हर्ष ए. पोद्दार (भा.पो.से.) तसेच अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात परीविक्षाधीन पोलीस उप अधिक्षक राहुल झालटे, पोलीस उप अधिक्षक तथा वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकम, सहायक पोलीस निरीक्षक अजाबराव नेवारे, महिला पोलीस हवालदार ज्योती लोखंडे, महिला पोलीस नायक सारीका इंदुरकर, महिला पोलीस अंमलदार कांचन चंदनखेडे पोलीस अंमलदार प्रफुल भातुलकर, चालक राहुल गडलिंग यांनी पार पाडली.