संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– नवी कामठी भागात विविध विकास कामांचे भूमिपूजन
कामठी :- विकास ही निरंतर सुरु असणारी प्रक्रिया असून स्थानिक लोकप्रतिनिधिनी मुलभुत सुविधाचां विकास करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे,असे वक्तव्य कामठी शहर भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर तुप्पट यांनी व्यक्त केले
नवी कामठी भागातील प्रभाग 15 आनंद नगर येथे आयोजित भूमिपूजन आणि लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सभा मंचावर पांडुरंग रामटेके,बालकदास सिंगाड़े, संपतराव खोब्रागडे, माजी नगरसेविका संध्या रायबोले,भाजपा पदाधिकारी लालसिंग यादव, संजय कनोजिया, प्रतिक पडोळे, विक्की बोंबले,कुणाल सोलंकी,कमल (लालु )यादव,शफीक शेख,सुनील खानवानी,कुंदा रोकडे,प्रिती कुल्लरकर,रोशनी कानफाडे,किरण मानवटकर,रेखा झंझाड उपस्थित होते.
नवी कामठीतील प्रभाग 15 मधे विधानपरिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाने यांच्या निधितील तसेच राज्य शासनाच्या विविध योजनां अंतर्गत मंजूर 1 कोटी 80 लाख निधिच्या विकास कार्याचे भूमिपूजन जेष्ठ नागरिक पांडुरंग रामटेके, बालकदास सिंगाड़े यांच्या हस्ते आणि 3 कोटी 72 लाख निधितुन करण्यात आलेल्या विकास कार्याचे लोकार्पण माजी नगरसेविका संध्या रायबोले यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी अरविंद चवडे, दिनेश खेडकर, रोहित दहाट, शंकर चवरे, बादल कठाने, हर्षल आमधरे, अभिषेक कनोजे,हर्ष धुर्वे,आर्यन हजारे,रोहित मेश्राम,शिवम पटले,विलास सिंगाड़े, निमिश सांगोडे,प्रफुल ऊके, रजत सोनी,गिता विश्वकर्मा, सरोज शाहू,राणी यादव, लक्ष्मी पारोले, छाया कोल्हे, सिता पटले यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक बिरजू चहांदे यांनी तर संचालन उज्वल रायबोले यांनी केले उपस्थितांचे आभार अवि गायकवाड़ यांनी मानले.