नागपूर :- जुनी कामठी पोलीसांचे पथक पेट्रोलींग करीत असतांना, खात्रीशीर माहिती मिळाली की, पोलीस ठाणे हद्दीत रूईगंज मैदान जवळ, सार्वजनीक ठिकणी एक ईसम अंगात लाल रंगाचा शर्ट व खाकी रंगाचा पॅन्ट घातलेला असुन त्याचे जवळ घातक शस्त्र आहे. अशा माहितीवरून शर्मा भट्टी समोर नमुद वर्णनाया इसम हा संशयीत हालचाली करतांना दिसुन आला, त्याला ताब्यात घेवुन त्याचे नाव पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नाव मोहम्मद साकीब वल्द मोहम्मद फारूख अंसारी वय २७ वर्ष, रा. वारीसपूरा, समीर हॉटेल मागे, कामठी, नागपूर असे सांगीतले. आरोपीची कायदेशीर अंगहाडती घेतली असता, त्याचे जवळ एक लोखंडी चाकु किंमती अंदाजे १५०/- रू. चा मिळून आल्याने जप्त करण्यात आला.
आरोपीने मनाई आदेशाचे उल्लंघन करून घातक शस्व बाळगतांना समक्ष मिळुन आल्याने त्याचे विरूध्द पोलीस ठाणे जुनी कामठी येथे पोउपनि, भंडारी यांनी कलम ४, २५ भा.ह.का., सहकलम १३५ म. पो.का. अन्वये गुन्हा दाखल करून, आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.