नागपूर :- फिर्यादी नामे राजकुमार दिपचंद बतरा वय ६१ वर्ष रा जैन गल्लीजवळ वार्ड क २, खापरखेडा जि नागपुर यांनी पोलीस स्टेशन खापरखेडा येथे येवुन तोंडी रिपोर्ट दिला कि, ते त्यांचे स्टेशनरी दुकानाचे काउंटर मध्ये एका बँग मध्ये नगदी ४०,५००/- रू ठेवुन दुकानाला लॉक लावुन घरी गेले असता, दिनांक २५.०३.२०२४ रोजी दुकानात आले असता पैसे ठेवलेली बँग दुकानातील काउंटर मध्ये दिसली नाही. कोणीतरी अज्ञात आरोपीने फिर्यादीचे दुकानाचे कुलुप तोडुन सदर बँग लंपास केल्याची रिपोर्ट वरून पोस्टे खापरखेडा येथे कलम ४५७,३८० भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयात सीसीटीव्ही फुटेज चे आधारे आरोपीचा शोध घेत असता माहीती मिळाली कि, फुटेज मध्ये दिसणारा आरोपी नामे सचिन राकेश कुंभरे वय २३ वर्ष रा. दुर्गा चौक बैल बाजार कामठी जि नागपुर हा आहे. त्याचा शोध घेतला असता तो वार्ड क २ येथे त्याचे राहते घरी मिळुन आला. त्याने पोलीस स्टेशन खापरखेडा येथे ३ घरफोड्या केल्याचे कबुली दिल्याने त्याचेकडुन कि ४२५०/-रू जप्त केले आहे. सदर गुन्हयातील आरोपी याची मेडीकल तपासणी करून जप्ती मुद्देमालासह पुढील तपासाकरीता पोलीस स्टेशन खापरखेडा यांचे ताब्यात देण्यात आले.
सदर ची कारवाई हर्ष पोद्दार, पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण, रमेश धुमाळ अपर पोलीस अधिक्षक, यांचे मागदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक बटुलाल पांडे, सफौ नाना राउत, पोलीस हवालदार विनोद काळे, ईकवाल शेख, प्रमोद भोयर, पोलीस नाईक संजय बरोदीया, पोलीस अंमलदार अभिषेक देशमुख, चालक मोनु शुक्ला तसेन्त्र सायबर सेल वे पोलीस अंमलदार सतिश राठोड, यांनी पार पाडली.