मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचा झपाटा.

399 फाईल्सचा निपटारा जनहिताच्या निर्णयांना वेग

 मुंबई  : राज्य सरकारमध्ये निर्णय प्रक्रियेला वेग आला असून नवीन सरकारने कार्यभार स्वीकारल्यापासून ते आजतागायत जनहिताचे विविध निर्णय झपाट्याने घेतले आहेत. 1 जुलै ते अगदी आत्तापर्यंत म्हणजे 8 ऑगस्टपर्यंतच्या कालावधीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 399 फाईल्सचा निपटारा केला आहे. विशेष म्हणजे यात नैसर्गिक आपत्ती मधील मदत, गरजूंना मदत, कृषि विभाग, मंत्री मंडळासमोर अणावयाचे प्रस्ताव, फाईल्स, विविध नवीन शासकीय नियुक्त्या, सरळ सेवा भरती, वन विभाग, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण अशा विविध विभागाच्या फाईल्सचा समावेश आहे.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या पहिल्याच बैठकीत विविध विभागाच्या सचिवांना सर्वसामान्यांची तसेच जनहिताची कामे गतिमान रितीने झाली पाहिजेत तसेच लोकांची कामे अडणार नाहीत हे पाहण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जनहितासाठी तत्परतेने निर्णय घेण्यात येत आहेत.

Next Post

‘हर घर तिरंगा’चा बलून आयुक्तांनी सोडला आकाशात.

Tue Aug 9 , 2022
१३ ते १५ ऑगस्ट प्रत्येक नागपूकराने घरावर तिरंगा लावण्याचे आवाहन नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान संपूर्ण नागपूर शहरामध्ये ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिकेद्वारे घरोघरी तिरंगा लावण्याचा संदेश देणारा बलून आकाशात सोडण्यात आला आहे. मनपा मुख्यालयात छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमध्ये मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com