लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नागपुरातून 26 तर रामटेकमधून 28 उमेदवार

– रामटेकमधून सात उमेदवारांचे अर्ज मागे

– नागपुरातून एकही अर्ज मागे नाही

नागपूर :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी अर्ज मागे घेण्याच्या आज अखेरच्या दिवशी रामटेक लोकसभा मतदारसंघातून सात उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. तर नागपूर लोकसभा मतदारसंघातून एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही.

नागपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची संख्या एकाही उमेदवाराने अर्ज मागे न घेतल्यामुळे 26 अशी कायम आहे. तर रामटेक लोकसभा मतदारसंघातील 7 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे ही संख्या 35 वरून 28 अशी झाली आहे.

रामटेक लोकसभा मतदारसंघातून गौरव गायगवळी, दर्शनी धवड, नरेश बर्वे, प्रकाश कटारे, डॅा. विनोद रंगारी, सुरेश साखरे आणि संदीप गायकवाड यांनी अर्ज मागे घेतले आहेत. नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विकास बनाम टिकास : क्या FRIENDLY CONTEST हैं या और कुछ ?

Sun Mar 31 , 2024
– पक्ष निहाय कट्टर समर्थक और मतदाता संभ्रम में  नागपुर :- नागपुर लोकसभा चुनाव में सीधी भिड़ंत कांग्रेस और भाजपा की ही है,दोनों ओर से कुछेक वोट कटुआ खड़े किये गए है,वह भी PAID. गर्मागर्म चर्चा है कि भाजपा उम्मीदवार नितिन गडकरी की जीत की हैट्रिक ‘मोदी-शाह’ पर निर्भर हैं.पिछले लोस चुनाव में उन्हें घर बैठाने की भरसक कोशिश की […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com