प्रेम संबंध च्या वादावरुन युवकाला लाकडी दंड्याने डोक्यावर मारुन केले जख्मी..

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी 

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत कामठी काॅलरी नंबर ३ येथे प्रेम संबंधा च्या वादावरून तीन आरोपीतांनी संगमत करून राधेश्याम बंडुजी मेश्राम यांना शिविगाळ करित लाकडी दंड्याने व हात बुक्याने मारहाण करून जख्मी केल्याने कन्हान पोलीसांनी पोस्टे ला तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

प्राप्त माहिती नुसार राधेश्याम बंडुजी मेश्राम वय २७ वर्ष राह.कामठी कॉलरी नं ३ यांच्या मोहल्यात राहणारी मुली सोबत राधेश्याम मेश्राम हयाचे काही महिन्या पासुन प्रेम संबंध असल्याने मुलीचा भाऊ प्रदीप ठाकुर याला माहिती झाल्याने तिच्या भावाने राधेश्याम मेश्राम याला २० ते २५ दिवसापुर्वी मारहाण केल्याने राधेश्याम मेश्राम यांनी प्रदीप ठाकुर याचा विरूध्द कन्हान पोस्टे ला तक्रार केली होती. बुधवार (दि.१२) ऑक्टोंबर ला रात्री ८ वाजता राधेश्याम मेश्रा म हा आपल्या घराशेजारी दुकानातुन काही सामान घेवुन घरी परत येत असतांना राधेश्याम मेश्राम हयाला रस्त्यात १) प्रदीप ठाकुर, २) राहुल चौव्हाण, ३) राजेश उर्फ लाली यादव हे भेटले तेव्हा प्रदीप ठाकुर हा राधे श्याम ला म्हणाला की, ” तुझे माझ्या बहीणी सोबत प्रेम संबंध होते, तेव्हा मी तुला या आधीपण मारले होते “, तरी पण तुझ्यात काही बदलाव आला नाही. असे म्हणुन आरोपी प्रदीप ठाकुर हा राधेश्याम ला शिवीगा ळ करू लागला तेव्हा राधेश्याम म्हणाला की, तु मला शिवीगाळ का करत आहे, असे म्हटले असता प्रदीप ठाकुर याने कोणत्या तरी लाकडी दांड्याने राधेश्याम च्या डोक्यावर मारले आणि त्याचे सोबत असणारे राहुल चौव्हाण व राजेश उर्फ लाला यादव या दोघांनी हात बुक्याने मारहाण करीत असतांना राधेश्याम च्या मोहल्लयातील काही लोकांनी राधेश्याम सोबत होणारे भांडण पाहुन त्यांनी भांडण सोडविले. राधेश्याम घरी गेल्यावर प्रदीप ठाकुर ने डोक्यावर काठी मारल्याने राधेश्याम चे डोके फुटुन रक्तं वाहत असल्याने त्यांच्या आईने डोक्यावर दुपट्टा बांधुन पोलीस स्टेशन कन्हान ला पोहचुन राधेश्याम बंडुजी मेश्राम यांनी तक्रारी केल्याने पोस्टे कन्हान ला आरोपी १) प्रदीप ठाकुर, २) राहुल चव्हाण, ३) राजेश उर्फ लाला यादव यांच्या विरूध्द कलम ३२४, ५०४, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कोळसा चोरी करणाऱ्या पाच आरोपींना ६ महिन्या करिता जिल्ह्यातुन केले हद्दपार..

Fri Oct 14 , 2022
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक मा.विजयकुमार मगर यांची कारवाई. कन्हान : – परिसरात मागिल अनेक दिवसा पासुन कोल माफिया सक्रिय होऊन विविध ठिकाणी अवैध कोळस्याचे टाल लावुन चोरीचा कोळसा बिनधास्त पणे मोठ्या प्रमाणात विकल्या जात असल्याने नागपुर ग्रामिण पोलीस अधिक्षक मा. विजयकुमार मगर यांनी परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैध कोळसा चोरी वर आळा घालण्याकरिता कोळसा चोरी करणाऱ्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!