कोळसा चोरी करणाऱ्या पाच आरोपींना ६ महिन्या करिता जिल्ह्यातुन केले हद्दपार..

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी 

नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक मा.विजयकुमार मगर यांची कारवाई.

कन्हान : – परिसरात मागिल अनेक दिवसा पासुन कोल माफिया सक्रिय होऊन विविध ठिकाणी अवैध कोळस्याचे टाल लावुन चोरीचा कोळसा बिनधास्त पणे मोठ्या प्रमाणात विकल्या जात असल्याने नागपुर ग्रामिण पोलीस अधिक्षक मा. विजयकुमार मगर यांनी परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैध कोळसा चोरी वर आळा घालण्याकरिता कोळसा चोरी करणाऱ्या पाच आरोपींना ६ महिन्या करिता जिल्ह्या तुन हद्दपार करुन केले आहे.

कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत मागिल अनेक दिवसा पासुन अवैध कोळसा, रेती, दारू, जुआ, सट्टा, नशिले पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या व कन्हान पोलीसांनी यावर अंकुश लावण्याकरिता कारवाई केली. परंतु आज ही परिसरात अवैध धंधे मोठ्या प्रमाणात बिनधास्त पणे सुरू आहे. परिसरात मागिल अनेक दिवसा पासुन अवैध चोरीचा कोळसा मोठ्या प्रमाणात विक्री करून गुन्हेगारी प्रवृत्तीने दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार टोळी प्रमुख १) उमेश मारोतराव पानतावणे वय ४९ वर्ष, २) बालचंद्र हरीराम बिलोने, ३) कुंदन ओमप्रकाश तिजारे वय ३२ वर्ष, ४) बादल अशोक चवरे वय ३० वर्ष, ५) आकाश अशोक चवरे वय ३० वर्ष सर्व रा.कांद्री कन्हान हे टोळीने एकत्र येऊन कन्हा न परिसरातील गोंडेगांव कोळसा खदानीतील अवैध रीत्या कोळस्याची चोरी करून त्याची विक्री करीत होते. या प्रकरणी सदर चे आरोपीतांवर पो.स्टे कन्हान येथे कोळसा चोरीचे सबंधाने एकुण १४ गुन्हे नोंद अस ल्याचे निर्देशनास आले आहे. आरोपीतांचे गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील राहणाऱ्या नागरिकांच्या मना मध्ये चांगलेच भीतीचे वातावरण निर्माण होऊन त्यांचे जिवीतास व शासकीय मालमत्तेस धोका निर्माण झाले ला आहे. सदर आरोपीतांचे कृत्ये लक्षात घेता त्यांचे गुन्हेगारी कृत्याला आळा बसविण्या करीता सराईत गुन्हेगारांचे टोळी विरुध्द कलम ५५ महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये कारवाई करून नागपुर जिल्हा ग्रामिण पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर यांनी मंगळ वार (दि.१०) ऑक्टोंबर २०२२ ला आरोपीतांना नागपुर शहर व नागपुर जिल्हा ग्रामिण हद्दीतुन ६ महिन्या करीता हद्दपारीची कारवाई केलेली आहे.

सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक ओम प्रकाश कोकाटे, प्रतिबंधक सेलचे पोउपनि भारत थिटे, पोलीस हवालदार सुनिल डोंगरे यांनी केली आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com