संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी बस स्टँड चौकातील श्री कृष्ण सुदामा टॉकीज च्या कडेला एक अनोळखी पुरुष अशक्त स्थितीत भुकेच्या व्याकुळलेल्या स्थितीत पडलेला दिसल्याने त्या मार्गाहुन जात असलेल्या धर्मपाल डोंगरे नामक व्यक्तीने माणुसकीचा हात दाखवून अल्पोहार दिला मात्र कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही मात्र श्वास सुरू होता.यावर तडकाफडकी 112 वर फोन करून माहिती दिली असता त्वरित पोलीस व अंबुलेन्स पोहोचली. सदर अशक्त इसमाला नजीकच्या शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.मात्र उपचारा दरम्यान सदर अनोळखी इसमाचा दुर्दुवी मृत्यू झाला.ही घटना 8 नोव्हेंबर ला घडली असून मृत्यूचे कारण भुकेच्या व्याकुळतेने अशक्तपणामूळे झाल्याचे सांगण्यात येते.