पोस्टे देसाईगंज येथील विविध दारुच्या गुन्ह्यातील एकुण १६,००,०००/- रुपयाचा जप्त मुद्देमाल केला नष्ट

गडचिरोली :- गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी असतांना अवैधरीत्या दारुची वाहतुक केली जाते. त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक निलोत्पल  यांचे आदेशान्वये पोस्टें देसाईगंज हद्दीतील अवैध दारू विक्री करणाऱ्यावर कठोर कार्यवाही करण्यात आलेली होती. त्यानुसार पोस्टे देसाईगंज येथील महाराष्ट्र दारुबंदी कायचा अन्यये प्रलंबीत दारुच्या मुद्देमालापैकी १६७ गुन्ह्यातील एकुण किमत १६,००,०००/- रुपयाचा जप्त करण्यात आलेला मुद्देमाल काल दिनांक २७/१२/२०१३ रोजी नष्ट करण्यात आला.

सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गडचिरोली यांचे परवानगीने काल दिनांक २७/१२/२०२३ रोजी पोस्टे देसाईगंज येथील प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक किरण रासकर यांनी राज्य उत्पादक शुल्क, गडचिरोली विभागाचे दुय्यम निरीक्षक चं. वि. भगत यांच्यासह पोस्टे देसाईगंज हद्दीतील विविध दारुबंदी गुन्ह्यातील जप्त मुघेमाल नष्ट करण्यात आला. ज्यामध्ये १) देशी दारुच्या ९० मिली मापाच्या ३६९५० बाटल्ल्या, २) देशी दारुच्या १८० मिली मापाच्या ३१७ बाटल्या, ३) विदेशी दारुच्या १८० मिली मापाच्या ६८० बाटल्या, ४) ७५० मिली मापाच्या विदेशी दारुच्या १७ बाल्या, ५) ५०० मिली बियरच्या ३० टिनाचे केंन असे एकुण ३७,९९४ बाटलाचे मुद्देमाल जेसीचिच्या सहाय्याने १० X १० चा खोल खड्डा खोदून रोड रोलरच्या सहाय्याने कडक व मुरमाळ जागेवरती मुद्देमाल पसरवून काचेच्या व प्लॉस्टीकच्या बॉटलांचा चुरा करण्यात आला व काचेचा चुरा व प्लॅस्टीकच्या चेपलेल्या बाटल्या जेसीचीच्या फावड्यांच्या सहाय्याने खड्यात टाकण्यात आला, तसेच खड्डा पूर्ववत बुजविण्यात आला. सदर मुद्देमालाची विल्हेवाट लावतांना पर्यावरणाची हानी होणार नाही याची पूर्णपणे दक्षता घेण्यात आली.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल,  अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख,अपर पोलीस अधीक्षक अहेरी एम. रमेश तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा साहील ड्रारकर यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे देसाईगंज येथील प्रभारी अधिकारी किरण रासकर व सर्च अंमलदार तसेच राज्य उत्पादन शुल्क विभगाचे सहकारी स्टॉफ यांचे उपस्थीतीत पार पडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अवैध रेती चोरी करणाऱ्या आरोपीतांविरुद्ध गुन्हा नोंद

Thu Dec 28 , 2023
– पोलीस स्टेशन भिवापूरची कारवाई भिवापूर :- पोलीस स्टेशन भिवापूर येथील स्टाफ भिवापूर हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना पोस्टे परीसरात हायवे रोड़ने पेट्रोलिंग करीत असतांना मौजा पांजरेपार गावाजवळ भिवापुर ते उमरेड जाणारे हायवे रोड वर अंदाजे २२/३० वा. दरम्यान १० चक्का टिप्पर क्र. एम. एच. ४० बी.एल ७३४५ हा संशयीतरित्या जाताना दिसल्याने सदर टिप्पर चालकास थांबण्याचा इशारा केला असता चालकाने टिप्पर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!