पूज्य भदंत सुभद्रबोधी यांच्या निर्वाण यात्रेत उसळला जनसागर

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- ऑल इंडिया भिक्खु संघ विदर्भ प्रदेश चे वरिष्ट भीक्खु,परित्राणाचार्य म्हणुन विदर्भातील अनगिनत गावागावात चिरपरिचीत प्रख्यात व्यक्तीमंत्व बुद्ध भीम गीता चे काव्य लेखन गायन ,वारेगाव ग्रामपंचायत चे ६०च्या दशकात सरपंच पद भुषविलेले समता सैनिक दल च्या सैनिकी जडणघडणीत अविरत निस्वार्थ तत्पर सेनानी, जयभीम प्रवर्तक लोकप्रिय बाबु हरदास एल एन यांच्या पंच्छात दुसर्‍या पिढीतील नेतृत्वात स्वाभिमानाने विचारधारेचे १९७१साली कामठीतील प्रबुद्ध नगर नयागोदाम येथे आयोजित वर्षावासनिमीत्त पुज्य भदंन्त आनंद कौसल्यायन यांचे हस्ते श्रामनेर दिक्षा प्राप्त करूण पुर्णवेळ धम्मप्रसार करत, अज्ञान अंधकार चमत्कार अनिष्ट असंभ्य रूढी परंपरा विरूद्ध सतत जनसामाण्यापर्यन्त धम्म विचार प्रसारीत करण्यात अग्रेसर,पुज्य भदंन्त सुभद्र सुबोधी महास्थविर यांचे पुर्वाश्रमिचे पैतृक निवास जे बुद्ध विहार करीता दान केले होते इथे आपल्या जन्मस्थळी मागील अनेक वर्षापासुन निवास करीत असता वृद्धापकाळामुळे काल 11 एप्रिल ला दुःखद निधन झाले तर आज दिनांक १२ एप्रिल ला वारेगाव येथील कन्हान नदी काठावर त्यांचा अंतीम संस्कार करण्यात आला या प्रसंगी मोठ्या संख्येत जनसागर उसळला तसेच आदरनिय भीक्खुसंघ भीक्खुणी संघ गावागावातील उपासक उपासिका, नागरिक उपस्थित होते.

याप्रसंगी भदंन्त सुभद्र सुबोधींच्या सानिध्यात गाव कुसातील जनसामान्य लोकापर्यत धम्म प्रचार-प्रसार करण्याची संधी लाभली, धम्म क्षेत्रातील अग्रगण्य विद्वान धम्मानुदेशकाच्या मार्गदर्शक भीक्खुच्या फळीतील एका आधारवड मार्गदर्शकास मुकलो अशा शब्दात बुद्धगये वरूण भदंन्त नाग दिपंकर महास्थविर यांनी आपली संवेदना व्यक्त केली.

भदंत धम्मधर महाथेरो, बोधानंद महाथेरो, ज्ञानबोधि महाथेरो, प्रज्ञाजोति महाथेरो, संघकिर्ती महाथेरो, धम्मोदय महाथेरो, धम्मजोती महाथेरो, सुमंगल थेरो, सीलवंस महाथेरो आदि भिक्खु संघ तसेच भिक्खुणी विनयशीला थेरी, संघशीला थेरी, संघमित्रा थेरी, आदि भिक्खुणी व सामणेरी संघ आणि हजारों च्या संख्येत उपासक – उपासिका उपस्थित होते.भीक्खुणी तक्षशिला यांनी आणी वारेगाव चे वाघमारे यानी ऋणानूबंध म्हणुन सेवारत राहीले, माहामाया महिला उपासिका संघ, समता सैनिक दल बुद्ध धंम्म प्रचारक आदर्श कवी मंडल, बौद्ध प्रशिक्षण संस्थान, बोधिमग्गो सेवा संस्था महाविहार ,आलोका ट्स्ट महाविहार, वटथाई इंडियन बुद्धिष्ट मोनेस्ट्री, ऑल इंडिया.भिक्खु.संघ विदर्भ प्रदेश व विविध क्षेत्रातील अग्रगण्य संस्था संगठन चे पदाधिकारी हजर होते.

बुद्धगया येथे भदंन्त महापंथ महास्थविर पुर्व महासचिव ऑल इंडिया.भिक्खु.संघ, भदंन्त प्रियदर्शी महास्थवीर ,भदंन्त ज्ञानदिप महास्थविर भदंन्त मंगल स्थविर भदंन्त पुर्णबोधी स्थविर, भदंन्त महाविरो स्थविर, कश्यप स्थविर आदी भीक्खुगण व उपासक उपासिकानी मंगल मैत्री बुद्ध विहार गौतम नगर बुद्धगया बिहार श्रद्धांजली व्यक्त केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा सत्यानाश केला - सुषमा अंधारे यांचा फडणवीस यांच्या वर घाणाघात

Fri Apr 12 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी नेते घडवले, फडणवीस यांनी कुणाला घडवले? त्यांनी तर नेते चोरले  कामठी :- देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा सत्यानाश केला बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी नेते घडवले फडणवीस यांनी कुणाला घडवले? त्यांनी तर नेते चोरली असा घाणाघात शिवसेना उध्दव ठाकरे यांच्या पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com