संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- नदी वरील नवनिर्मित पुलाचे उद्घाटन होत फक्त अकरा महिने झाले असुन खुप वेळा मोठ – मोठे गड्डे पडुन सळाखी दिसु लागल्याने युवक काँग्रेस च्या पदाधिका-यांनी गड्ड्यास फुले व कमळाचे फुल लावुन विकास कामांच्या निकृष्टतेला श्रद्धांजली देत जनप्रतिनिधि, शासन, प्रशासन आणि संबंधित अधि का-यांचे लक्ष वेधुन पुलाच्या बांधकामाची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषी अधिकारी व कंत्राटदावर कठोर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
कन्हान नदी नवनिर्मित पुलाचे भुमिपुजन २०१४ साली तत्कालीन केंद्रीय मंत्री फर्नांडिस यांच्या हस्ते आणि तत्कालीन खासदार मुकुल वासनिक यांचा प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. पुल तीन वर्षात पुर्ण होण्याचे आश्वस्त केल्यानंतर मध्यंतरी घडलेल्या राजकीय घडामोळीमुळे पुलाचे कार्य संथगतीने झाले. पुलाचे बांधकाम ताराकुंड कंपनी द्वारे करण्यात आले असुन पुलाच्या बांधकामाला जवळपास नऊ वर्ष लागली. (दि.१) सप्टेंबर २०२२ ला केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नीतिन गडकरी यांच्या हस्ते, विधान परिषद आमदार चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाने, आमदार आशिष जयस्वाल, माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनिर्मित पुलाचे उद्घाटन करण्यात आले.
तेव्हा पासुन पुलावरुन दिवस रात्र जड वाहनांची रहदारी सुरु झाली. मध्यंतरी पुलावर खुप वेळा मोठ मोठे गड्डे पडुन सळाखी बाहेर आल्याने वाहन चालकांना बराच त्रास सहन करावा लागत असुन अनेक निर्दोष वाहन चालक वाहनासह रोडावर पडुन गंभीर जख्मी होऊन अपगंत्वास कारणीभुत ठरले. या संदर्भात प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये बातमी प्रकाशित होताच पुलावरील गड्डे बुझवुन फक्त लीपापोती करून खानापुर्ती करण्यात आली. आता पुन्हा एकदा कन्हान नदी नवनिर्मित पुलावर मोठ मोठे गड्डे पडुन सळाखी बाहेर आल्याने पुलाचा बांधकामावर प्रश्न निर्माण होऊन मोठ्या अपघाताची दाट शक्यता नाकारता येत नसल्याने शहर युवक काँग्रेस पदाधिका-यांनी अध्यक्ष आकिब सिद्धिकीच्या नेतृत्वात गड्ड्यात फुले टाकुन कमळाचे फुल लावुन विकास कामांच्या निकृष्टतेला श्रद्धाजंली अर्पण करित जनप्रतिनिधि, शासन, प्रशासन आणि संबंधित अधिका-यांचे लक्ष वेधुन पुलाच्या बांधकामाची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकारी व संबधित कंत्राटदारावर कठोर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
या प्रसंगी कन्हान शहर युवक काँग्रेस अध्यक्ष आकिब सिद्धिकी, कार्याध्यक्ष आनंद चकोले, उपाध्यक्ष कृणाल खडसे, महासचिव विनोद येलमुले, नगरपरिषद उपा ध्यक्ष योगेंन्द्र रंगारी, नगरसेवक मनिष भिवगडे, नगर सेविका गुंफा तिडके, रेखा टोहणे, पुष्पा कावडकर, अजय कापसिकर, सतिश भसारकर, महेश धोगडे, अल्फास शेख, ओम ठाकुर, अनिस शेख, शहानद शेंडे, रोहित आंबागडे, साहिल खान, पुर्वांशु बेलखोडे, अरशद खान, सुनिल आंबागडे सह युवक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते बहु संख्येने उपस्थित होते.