पठाणपुरा येथील १३ नळ जोडणी खंडित

चंद्रपूर :- करवसुली अधिक काळापासुन थकीत असल्याने व वारंवार सुचना देऊनही कराचा भरणा न केल्याने मनपा कर वसुली पथकातर्फे पठाणपुरा वॉर्ड क्र.१ व २ येथील १३ नळधारकांची नळ जोडणी खंडित करण्यात आली आहे.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून कर वसुलीसाठी झोननिहाय विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी मनपा अधिकारी कर्मचारी यांची १४ पथके सातत्याने कार्यरत आहेत. थकीत कराचा भरणा न करणाऱ्या मालमत्ता धारकांच्या मालमत्तेला सिल लावण्याची अथवा नळ कनेक्शन खंडीत करण्याची कारवाई मोठ्या प्रमाणात सुरु आहे.

कर वसूली मोहीमेदरम्यान दरम्यान पठाणपुरा वॉर्ड क्र.१ व २ येथील आडकू कान्हु गौरकार,मारोती शंकर गौरकार,बापुजी बालाजी व लक्ष्मण ईरगीरवार,सुंदराबाई खनके,पुंडलिक खनके यांच्या मालकीच्या मालमत्तेवर कर अधिक काळापासुन थकीत असल्याचे आढळुन आले त्याचप्रमाणे सदर मालमत्ता धारकांना कर भरण्याबाबत वारंवार सुचना दिल्याचेही आढळून आले,मात्र थकबाकीदारांद्वारे कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने दरम्यान पठाणपुरा वॉर्ड क्र.१ व २ येथील आडकू कान्हु गौरकार,मारोती शंकर गौरकार यांचे प्रत्येकी १,बापुजी बालाजी व लक्ष्मण ईरगीरवार यांचे ६,सुंदराबाई खनके यांचे २,पुंडलिक खनके यांचे ३ असे एकुण १३ नळ जोडणी खंडीत करण्यात आली आहे.   

काही मालमत्ता धारक हे धनादेशाद्वारे कराचा भरणा करतात, अधिकतम धनादेश हे वटले जातात, मात्र जे धनादेश वटले जाणार नाही त्यांच्यावर फौजदारी कारवाई मनपातर्फे करण्यात येत आहे.दरम्यान मालमत्ता कराच्या शास्तीत २५ टक्के सूट मिळण्याची अंतिम तारीख ३१ मार्च असुन मालमता धारकांनी कराचा भरणा वेळेत करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

करावा भरणा – www.cmcchandrapur.com या लिंकवर Pay Water Tax Online या टॅबवर पाणीपट्टी कराचा तर https://chandrapurmc.org या लिंकवर मालमत्ता कराचा ऑनलाईन भरणा करता येणे शक्य आहे. त्याचप्रमाणे फोन पे, गुगल पे,भीम या युपीआय ॲपवर सुद्धा मालमता व पाणी कराचा भरणा करता येणे शक्य आहे.मनपाच्या झोन कार्यालयांमध्ये प्रत्यक्षरीत्या कराचा भरणा करता येईल. तसेच व्हॉट्सॲप चॅटबॉटचा वापर करून सुद्धा मालमत्ता कर भरता येणार असुन याकरिता 8530006063 या क्रमांकावर वर “hi” टाईप करून आलेल्या उत्तरात ४ था क्रमांकाचा पर्याय निवडुन कर भरता येईल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कन्हान ९०० मिमी फीडरवर शटडाऊन...

Mon Feb 26 , 2024
– बाधित भागात टँकरचा पुरवठा नाही… नागपूर :- सेवेची विश्वासार्हता वाढवण्याच्या प्रयत्नात, OCW (ऑरेंज सिटी वॉटर) आणि NMC (नागपूर महानगरपालिका) यांनी बुधवार, 28 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10:00 ते गुरुवार, 29 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 04:00 वाजता पर्यंत 18 तासांसाठी कन्हान WTP बंद ठेवण्याची योजना आखली आहे. खाली नमूद केलेल्या कारणांसाठी शटडाउन होणार आहे: 1. कन्हान WTP येथे कोरड्या विहिरी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com