– ग्राहक पंचायत तथा चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठान तर्फे आयोजन
– १०५ विद्यार्थ्यांचा केला गौरव
रामटेक :-काल दि. १ मे ला शहरातील नगर परिषदेजवळील बालोद्यान मध्ये ग्राहक पंचायत महाराष्ट्र व चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठान मनसर तर्फे भव्य पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी अनेक विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
विद्यार्थी ग्राहक जागृती २०२२ – २३ उपक्रमांतर्गत रामटेक, मौदा, पारशीवनी, तालुक्यातील अनेक शाळेत विद्यार्थी ग्राहक जागृती चे उपक्रम ,ग्राहक पंचायत महाराष्ट्र नागपूर ग्रामीण अध्यक्ष कांचनमाला मोरेश्वर माकडे, रामटेक तालुका अध्यक्ष मोरेश्वर दामोदर माकडे, रामटेक तालुका सचिव श्रीधर पुंड , रामटेक तालुका संघटक अनिल मिराशे यांचे तर्फे राबविण्यात आले होते. आजचा लहान विद्यार्थी उद्या देशाचं भविष्य आहे आणि त्यांची व्यवहार करताना कुठेही फसवणूक होऊ नये, जागरूक व दक्ष विद्यार्थी ग्राहक निर्माण करणे या हेतूने विद्यार्थी ग्राहक जागृती करण्यात आली. यात विद्यार्थी ग्राहक जागृती सोबतच विविध शाळा कॉलेज महाविद्यालयामध्ये रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पोस्टर्स स्पर्धा, घेण्यात आल्या होत्या ,यात प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना काल दि. १ मे ला बक्षीस तथा सन्मानचिन्ह देवुन गौरविण्यात आले.ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे विदर्भ प्रांत अध्यक्ष शामकांत पात्रीकर यांच्या अध्यक्षतेखाली, ग्राहक पंचायत महाराष्ट्र विदर्भ प्रांत संघटक डॉक्टर कल्पना उपाध्याय, यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर जिल्हा ग्राहक पंचायत अध्यक्ष विप्लब मुजुमदार, नागपूर जिल्हा ग्राहक पंचायत सचिव मुकुंद अडेवार, लोकसेवा प्रतिष्ठान व रामधामचे संचालक चंद्रपाल चौकसे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुरस्कृत करण्यात आले. कार्यक्रमात १०५ विद्यार्थ्यांना लोकसेवा प्रतिष्ठान मनसर व ग्राहक पंचायत महाराष्ट्र च्या संयुक्त विद्यमाने ट्रॉफी व सोनेरी पहाट बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष व ग्राहक पंचायत महाराष्ट्र नागपूर जिल्हा संघटक रेखा भोंगाडे यांचे तर्फे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. डॉक्टर कल्पना उपाध्याय यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून विद्यार्थ्यांना अनुचित व्यापाराबद्दल व्यवहाराबद्दल माहिती देऊन अमूल्य मार्गदर्शन केले. चौकशे यांनी भविष्यात विद्यार्थी हा फसवला जाऊ नये म्हणून राबविलेल्या उपक्रमाचे ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या कार्याचे कौतुक केले. सर्व विद्यार्थ्यांना चंद्रपाल चौकशे यांच्यातर्फे रामधाम निशुल्क दाखविण्याचे जाहीर केले.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र ला लागेल तेव्हा मदत करण्याचे सुद्धा या वेळेला जाहीर करण्यात आले. शामकांजी पात्रीकर विदर्भ प्रांत अध्यक्ष यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी अनुचित व्यापाराला बळी पडू नये म्हणून काळजीपूर्वक व्यवहार करावा छोट्या छोट्या खरेदी विक्री करताना जागृत राहून कराव्या. लहान लहान गोष्टीतूनच माणूस शिकून मोठा होत असतो हे विशेषत्वाने मार्गदर्शनात नमूद केले ग्राहक पंचायत महाराष्ट्र नागपूर ग्रामीण अध्यक्ष कांचनमाला मोरेश्वर माकडे, राष्ट्रीय आदर्श विद्यालय रामटेक चे प्राचार्य बर्वे , ग्राहक पंचायत रामटेक शाखा तालुका अध्यक्ष मोरेश्वर माकडे, सचिव श्रीधर पुंड, संघटक अनिल मिरासे, सदस्य सुभाष चव्हाण, शारदा बर्वे, विमल नागपुरे, मोहन कोठेकर, नाशिर शेख , विलास भिवगडे श्रीराम विद्यालय रामटेक, वाघुलकर , विकी पुंड यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विविध शाळेतील शिक्षक , विद्यार्थी व पालक उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे संचालन कांचनमला माकडे यांनी केले .कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रामटेक तालुका संघटक अनिल मिरासे यांनी केले.