नागपूर :-प्रदीप खोरगडे वय वर्ष 39 राहणार घोगली, बेसा येथील गृहस्थ असून हे आपल्या (कार) MH 40 -BE 7885 स्विफ्ट डिझायर व्हीडीआयने मौदा वरून गंगाबाई घाट नागपूर कडे येतांना भगवती इलेक्ट्रॉनि जवळ आपल्या दोन मित्रांना सोडून गांधीबाग साईडला जात असल्याने जगनाडे चौकातून राईट टर्न घेऊन गायत्री मंदिर सिटी बस समोर त्यांच्या कारला अचानक आग लागली.
मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड या कंपनीची निर्मिती केलेली स्विफ्ट डिझायर 2018 या गाडीला अचानक आग लागल्या गेली. ही घटना 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास घडली.
तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडली आहे. परंतु लक्षात येताच कार चालक गाडी खाली उतरले. व कार ला भयानक आग लागली. त्यांनी पोलीस स्टेशन कोतवाली येथे तक्रार दाखल केली. या कार मध्ये जीवहानी झालेली नाही. मोठा अनर्थ टळला. ही माहिती त्यांनी प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.