अमरदिप बडगे, प्रतिनिधी
गोंदिया :- जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील बाघोली येथील सुरेश छगन वानखेडे वय ३० शेतात रोहणीचे कामा निमित्त शेतात किचड करण्यासाठी भाड्याने टँकटर नेले होते. नागरंटी झाल्यावर टँकटर घेऊन परतला शेतकरी सुरेश वानखडे शेतातच काम करीत राहिला. सायंकाळ होऊनही मुलगा घरी परत का आला नाही म्हणून आई शेताकडे गेली असता. मुलगा बाधित पाण्यात मुत्यु अवस्थेत दिसला. घरी परत येऊन गावात सांगितले असता गावकऱ्यांनी व कुंटुबातील लोकांनी शेता कडे धाव घेतली व दवनीवाडा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलीस बिट अंमलदार यांनी मर्ग दाखल करुन घटनास्थळी पंचनामा तयार करून प्रेत स्वविच्छेदन साठी उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे पाटविण्यात आले.आज स्वविच्छेदन झाल्यावर प्रेत कुंटुबाच्या स्वाधीन करण्यात आले. शेतकऱ्याची परिस्थिती हलाखीची असुन शाननाने मदत करावी व शेतकऱ्याला गोपीनाथ मुंडे योजनेचा लाभ घ्यावा . त्यांच्या मागे पत्नी, आई, दिड वर्षाची मुलगी असुन कुंटुब भावर आथिर्क संकट ओढावले आहे.