माहिती अधिकार वापरातून जागरूक समाजाची निर्मिती व्हावी – राहुल पांडे

– ‘माहिती अधिकार सप्ताहाचा’ समारोप

नागपूर :- माहितीचा अधिकार कायद्याचा प्रभावी, परिणामकारक आणि प्रामाणिक वापर होणे ही काळाची गरज आहे. नागरिकांनी या कायद्याच्या जास्तीत जास्त वापरातून जागरूक व दक्ष सक्षम निर्मितीसाठी पुढे यावे, असे आवाहन राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी केले.

राज्य माहिती आयोगाच्या नागपूर खंडपीठाद्वारे 6 ते 12 ऑक्टोबर या कालावधीत आयोजित माहिती अधिकार सप्ताहाचा आज वनामती येथे समारोपीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी पांडे बोलत होते.

याप्रसंगी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, वनामतीच्या संचालक डॉ. मिताली सेठी, प्रशिक्षण संचालक सुवर्णा पांडे, माहिती अधिकार कार्यकर्ते व लेखक अभय कोलारकर यावेळी उपस्थित होते.

पांडे यांनी शासकीय प्राधिकरणांनी आपल्या माहितीचे डिजिटलायझेशन करून ऑनलाईन माहितीचा मार्ग नागरिकांसाठी मोकळा करून देण्याची आवश्यकता प्रतिपादित केली. माहिती अधिकारातून प्रशासनातील त्रुटींकडे लक्ष वेधण्यात यावे. कायद्याचा वापर हा सामाजिक न्यायासाठी, लोकांचे प्रश्न सोडविण्याचे धोरण ठरवणाऱ्या मंडळीपर्यंत पोहोचण्यासाठी व्हावा. त्यावर मुठभर लोकांची मक्तेदारी असता कामा नये. माहिती अधिकाराच्या योग्य वापरातून समाजावर सकारात्क परिणाम व शासन व्यवस्थेला पारदर्शी करण्याचा उद्देश सफल व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

हे पारदर्शकतेच युग असून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपले कार्य प्रामाणिकपणे केल्यास माहिती अधिकार अडचण ठरणार नाही, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. माहिती अधिकार कायद्याचा दुरूपयोग करणाऱ्याविरूद्ध गुन्हे दाखल करण्याची कायद्यात तरतूद असल्याचेही ते म्हणाले.

जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी नागरिकांना माहिती अधिकार वापरण्याची गरजच पडू नये म्हणून प्रशासनाद्वारे स्वयंप्रेरणेने जास्तीत जास्त माहिती ऑनलाईन उपलब्ध करण्याचे सांगितले.

‘सफर : माहिती अधिकाराचा’ पुस्तकाचे प्रकाशन

सुरवातीला माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर लिखीत ‘सफर : माहिती अधिकाराचा’ या त्यांच्या वेचक व वेधक अनुभवावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कोलारकर यांनी लोकोपयोगी व सकारात्मक कार्यासाठी माहिती अधिकार कायद्याचा उपयोग करण्याचे सांगितले. आपल्या अनुभवाचा नागरिकांना उपयोग व्हावा यासाठी पुस्तक प्रकाशित करत असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले.

मिताली सेठी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविक माहिती उपसचिव रोहिणी जाधव यांनी तर कार्यक्रमाचे संचालन मिलींद तारे यांनी केले. कार्यक्रमाला माहिती अधिकार क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते, वनामती येथे सेवा प्रशिक्षण घेत असलेले विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांच्या आवश्यक सुविधांची खातरजमा करा - विभागीय आयुक्त

Fri Oct 13 , 2023
Ø अन्नदान वाटपासाठी अन्न प्रशासन विभागाची परवानगी अनिवार्य Ø शहर व एसटी बसेसची मुबलक उपलब्धता ठेवण्याचे निर्देश Ø पिण्याचे पाणी व स्नानगृह उपलब्धतेच्या सूचना जागोजागी लावणार Ø मुख्य समारोह परिसर नो प्लास्टिक झोन कटाक्षाने पाळणार नागपूर :- प्रशासनासाठी नागपूर दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तनदिनाचे आयोजन महत्वपूर्ण उत्सवपर्व असून या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक अनुयायांना आरोग्य, सुरक्षा, स्वच्छता, खानपान सुविधांचा योग्य वापर करता यावा, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com