नागपूरआणि बहुजन समाजाला विकासाकडे नेण्याचा सक्रियतेने प्रयत्न करणारे राजकीय नेते क्रांतीसिह नाना पाटील यांच्या जयंती निमित्त मनपा प्रशासकीय इमारतीतील दालनात क्रांतीसिह नाना पाटील यांच्या तैलचित्रला मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना, राम जोशी, उपायुक्त रवींद्र भेलावे, उपायुक्त (महसूल) मिलींद मेश्राम, विजय हुमणे, सहायक आयुक्त प्रकाश वराडे व महेश धामेचा यांच्यासह शयनाज हसन, सुषमा राऊत, वंदना महल्ले, सुचिता मावळे, आशा माने आणि पापडकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.