नागपूर :- बहुजन समाज पार्टीने संघटन बांधणीवर जोर दिला असून तरुण व मिशनरी कार्यकर्त्यांना शहराची जबाबदारी देणे सुरू केलेले आहे. त्याची सुरुवात जयताळा निवासी इंजिनियर सुमंत गणवीर यांना नागपूर शहर बसपाचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
सुमंत गणवीर हे 1990 पासून बसपा चे कार्यकर्ते असून यापूर्वी 2004 ला अस्तित्वात आलेल्या दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभेचे प्रथम अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे. ते स्वतः एक शाळा संचालित करीत असून ते मिशनरी वृत्तीचे कार्यकर्ते आहेत.
सुमंत गणवीर यांच्या निवडीचे महाराष्ट्र प्रदेश बसपाचे अध्यक्ष एड संदीप ताजने, प्रदेश प्रभारी एड सुनील डोंगरे, प्रदेश महासचिव नागोराव जयकर, सचिव रंजना ढोरे, पृथ्वीराज शेंडे, विजयकुमार डहाट, राजू भांगे, नितीन शिंगाडे, उत्तम शेवडे, जिल्हा प्रभारी राहुल सोनटक्के, नरेश वासनिक, प्रा सुनील कोचे, जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, उपाध्यक्ष अमित सिंग, महासचिव प्रताप सूर्यवंशी, जिल्हा सचिव अभिलेश वाहाने, डॉ शितल नाईक, शहराध्यक्ष शादाब खान, उमेश मेश्राम, विशाल बन्सोड, महिला नेत्या सुरेखा डोंगरे, सुनंदा नितनवरे, वर्षा वाघमारे, संघमित्रा शेवाळे, सुषमा गणवीर, शिवपाल नितनवरे, युवानेता चंद्रशेखर कांबळे, आदेश रामटेके, प्रकाश शेवाळे, अश्वम चहांदे आदीं बसपा नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी इंजि सुमित गणवीर ह्यांचे त्यांच्या निवासस्थानी जाऊन स्वागत केले आहे.