घरफोडी करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

नागपूर :- पोलीस ठाणे प्रतापनगर हद्दीत प्लॉट नं. १०५, प्रणवहीत अपार्टमेंट, पांडे ले-आउट, खामला रोड, नागपूर येथे राहणारे फिर्यादी सुमीत अशोक पोहरकर, वय ३६ वर्ष, हे आपले घराला कुलूप लावुन परिवारासह, बाहेर गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घराचे मुख्य दाराचे कुलूप तोडुन आत प्रवेश करून घरातील बेडरूम मधील लोखंडी आलमारी मधील रोख १,५०,०००/- रू. व सोन्या-चांदीचे दागिने असा एकुण किंमती अंदाजे १,६६,३००/- रू. या मुद्देमाल चोरून नेला.

याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे प्रतापनगर येथे सपोनि, तांबे यांनी अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१ (४) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करून, पुढील तपास करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अवैधरीत्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद

Fri Aug 30 , 2024
भिवापूर:-  पोस्टे भिवापूर येथील स्टाफ पोस्टे हद्दीत पेट्रोलींग करीत असता गोपनीय माहिती मिळाली की, एक इसम अॅक्टीवा स्कुटीने दारू घेवुन उमरेड वरून भिवापूर येथे येत आहे. अशी माहिती मिळाल्याने भिवापूर स्टाफ यांनी नमुद घटनास्थळी नाकाबंदी केली असता अॅक्टीवा (स्कुटी ५ जी) क्र. MH -49/BL-9341 ने अवैधरीत्या दारू वाहतूक करणारा इसमास नाकाबंदी केली असता आरोपी नामे मिलींद मोरेश्वर मेश्राम वय ३२ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com