नागपूर :- पोलीस ठाणे यशोधरानगर हद्दीत प्लॉट नं. १७६, मॉ. वैभवलक्ष्मी हाऊसिंग सोसायटी, राजनगर, बांजरा ले आउट, नागपूर येथे राहणारे फिर्यादी नामे हबीब खान हुसैन खान वय ६८ वर्ष हे आपले राहते घराला कुलूप लावुन परिवारासह मोठा ताजबाग येथे ताजुद्दीन बाबाचे ऊर्स कार्यक्रमा निमीत्त गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घराचे दाराचे कुलूप तोडुन आत प्रवेश करून दोन्ही आलमारीचे लॉक तोडुन रोख ८०,०००/- रू. व सोन्या-चांदीचे दागिने असा एकुण किंमती अंदाजे ५,४१,६५०/- रू. चा मुद्देमाल चोरून नेला.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे यशोधरानगर येथे सपोनि तायडे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१ (४) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आहे.