अमरावती :- कुंभार समाजाचे आराध्य दैवत श्री. संत गोरोबा काका यांची पुण्यतिथी मंगळवारी 18 एप्रिल रोजी शहरातील बडनेरा रोडवरील श्री. संत गोरोबा भवन, शशीनगर येथे समाजबांधवांनी मोठया भक्तीभावाने साजरी केली.
सकाळी 7.00 वाजता गोरोबा काका यांचा अभिषेक करुन पूजाअर्चना व पालखी पूजन करण्यात आले. त्यानंतर मोठ्या भक्तिभावाने दिंडया पताका, अभंग गायन आणि गोरोबा काकाचा जयघोष करीत पालखी प्रदक्षिणा काढण्यात आली. शशीनगरवासीयांनी देखील ठिकठिकाणी रांगोळ्या काढून पालखी पूजन केले. ही पालखी भ्रमण करीत वाजतगाजत पुन्हा मंदिरात आली.
त्यानंतर शामराव राठोड महाराज यांचे गोरोबा काकाच्या जीवन व भक्तीमार्गावर संगीतमय सुश्राव्य कीर्तन व त्यानंतर गोपालकाला झाला. पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला कलश पूजन,तीर्थस्थापना व नवदाम्पत्याकडून होमपूजा आदी धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. यावेळी विदर्भ कुंंभार समाज सुधार समितीचे अध्यक्ष सुधाकर शेंडोकार यांचे अध्यक्षतेखाली सर्व कार्यक्रम संपन्न झाले. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. गजानन तांबटकर, सचिव सुरेंद्र सरोदे, कोषाध्यक्ष सतिश गावंडे, सहसचिव मधुकर खांडेकर, जिल्हाध्यक्ष सुनिल भागवत, महिला अध्यक्ष प्रभा भागवत, पदाधिकारी सर्वश्री विनोद मेहरे, विलास धामणकर, विनायक तायडे, गजानन वडुरकर, गजानन काकडे, दिनेश टेंभरे, विजय गुजरे, रूपराव खोपे, निर्मला नांदुरकर, सुरेश नांदुरकर, मोहन नांदुरकर, नंदकिशोर नांदुरकर, नंदकिशोर काकडे, रवि काकडे, नंदु काळकर, राजेंद्र भागवत, रमेश अंबुलकर, युवक अध्यक्ष रमेश अंबुलकर, प्रसिद्धी प्रमुख डॉ. विलास नांदुरकर, दिलीप खांडेकर, केशव मदनकर, अरूण पोहनकर, महिला मंडळ सदस्या मंदा काळे, सविता कोल्हे, सविता काकडे, नंदा पोहनकर, संगिता साळविकर, सुषमा काळकर, सुषमा काकडे तसेच सर्व पदाधिकारी, सल्लागार समितीचे पंजाबराव, डॉ. श्रीराम कोल्हे, शहरातील त्याचबरोबर गावोगावचे समाजबांधव, भजनी मंडळे मोठया संख्येत उपस्थित होते.