सावनेर :- पो.स्टे. सावनेर दिनांक २०/०१/२०२४ चे सकाळी ५/३० वा. ते ६/३० वा. दरम्यान पोलीस स्टेशन सावनेर येथील पोलीस पथक पोलिस चौकी पाटणसावंगी परिसरात पेट्रोलिंग करीत असता गुप्त माहिती मिळाली की, काही इसम विनापरवाना व अवैधरीत्या जनावरांना निर्दयतेने कोंबुन वाहतूक करीत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहिती वरुन सावनेर पोलीस पथकाने पाटणसांवगी ते खापा रोड वरील रेल्वे फाटका जवळ नाकाबंदी करून बोलेरो पिकअप वाहन क्र. MH-40/CM-4116 व MP 28 G 4289 प्रत्येकी किंमती ६ लाख प्रमाणे १२ लाख या वाहनात एकूण ८ म्हशी व १ हेला एकूण किंमती २,६५,०००/- रुपयाचे अत्यंत क्रूर व निर्दयतेने डांबून आखुड दोरीने बांधून त्यांना चारा पाणी न देता दाटीवाटीने अपुन्या जागेत ठेऊन करतली करिता घेऊन जातांना वाहतूक करतांना मिळून आल्याने वाहन चालक आरोपी नामे १) संदीप रमेश कोलारे, वय २५ वर्ष रा. राजना जि. चिंचवाडा २) महेश सेवकराम जाधव वय ४८ वर्ष रा. राजना, पहिजे आरोपी वाहन मालक नामे दुर्गेश बदखाने व बिद्रेश बदखाणे दोन्ही रा. राजना यांचे विरुद्ध पोस्टे सावनेर येथे कलम २७९, १०९, ३४ भा.द.वी. सहकलम ३, ११(१) (घ), (ङ), (च) प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, सहकलम ५ (अ)९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ सहकलम ११९ महा. पो. अधि. १९५१ सहकलम १९२ (अ), १७९, १८४ मो.वा.का. अन्वये कारवाई करण्यात येत आहे.