मौदा :-दिनांक २४/०५/२०२४ रोजीचे मध्यरात्री दरम्यान पोस्टे मौदा येथील स्टाफ पो. स्टे. मौदा हद्दीत अवैध गोवंश वाहतूकीस आळा घालणेकरिता पेट्रोलिंग करीत असताना भंडारा ते नागपूर NH-53 रोडवर टाटा योद्धा लहान मालवाहू वाहणातून अवैधरित्या निर्दयतेने गोवंश जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्याने मौदा येथील मधुवन हॉटेल समोर NH 53 रोडवर नाकाबंदी करून, वाहने तपासत असताना एक टाटा योद्धा मालवाहू वाहन येतांना दिसले त्या वाहनावर संशय आल्याने त्यास टॉर्च च्या सहाय्याने ईशारा देऊन धांवविण्यास सांगितले. पोलिसांना पाहून वाहन चालकाने वाहण वळवून भंडाराचे दिशेने भरधाव वेगाने पळवून लावले, दरम्यान अवैध गोवंश वाहतुक करणाऱ्या वाहणाच्या चालकाचे वाहणावरील नियंत्रण सुटल्यामुळे वाहन धानला गावाजवळील प्रवेशद्वारा जवळील नहरामध्ये पलटून वाहणाचे नुकसान झाले, वाहणातील क्लीनर अंधाराचा फायदा घेऊन मोक्यावरून पळून गेला तसेच वाहनाचा चालकास पकडण्यात यश मिळाले. सदर वाहनाची पाहणी केली असता टाटा योद्धा वाहन क्र. MH-30/BD-5207 मध्ये १२ गोवंशिय जनावरे अत्यंत निर्दयतेने कोंबून, आखूड दोरखंडाने बांधुन व जनावरांची चारापाण्याची कोणतीही व्यवस्था न करता कत्तली करिता घेऊन जातांना मिळून आले.
वाहन चालकास त्याचे नाव विचारले असता त्याने आपले नाव आबीद सय्यद अली वल्द सय्यद साबीर वय २७ वर्ष, राहणार कोळसा टाल, कामठी असे सांगीतले. टाटा योद्धा वाहनाच्या चालकास ताब्यात घेऊन त्यांचे ताब्यातून १२ गोवंशिय जनावरे प्रत्येकी १०,०००/- रु. प्रमाणे १,२०,०००/- रू व टाटा योद्धा वाहन किंमती ५,००,०००/- रू. व एक रेडमी कंपनीचा मोवाइल किंमती १००००/- रू. असा एकूण ६,३०,०००/- रू चा माल जप्त करण्यात आला असून गोवंशिय जनावरांना योग्य व्यवस्थापनार्थ ज्ञान फॉउंडेशन गोरक्षण केंद्र भंडारा येथे दाखल करून आरोपीतां विरुद्ध कलम ११(१) (प) (ड) (च) प्रा. छळ प्रति. अधि. १९६० सहकलम ५ अ (१),९ महा. प्रा. सं. सुधारित अधि. २०१५ सहकलम २७९, ४२७ भा.द.वि सहकलम १८४ मोवाका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदरची कार्यवाही ही हर्ष पोहार पोलीस अधिक्षक नागपुर (ग्रा.), रमेश धुमाळ अपर पोलीस अधिक्षक नागपुर (ग्रा), उपविभागीय पोलीस अधिकारी कामठी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार व पो.नि. सतीशसिंह राजपूत, पोहवा. गणेश मुदमाळी, पो.ना. दिपक दरोडे, पो.अं अतिश गाढवे, पो.अं शुभम ईश्वरकर, पो. अं अतुल निंबरते, पो.अं आशिष रडके यांनी केलेली आहे.