पो.स्टे. कन्हान :- आंबेडकर चौक कन्हान येथील आकाश पान पॅलेस एसबीआय एटीएम जवळ डायल ११२ वर खबर मिळाली की, आंबेडकर चौक कन्हान येथील विक्की नावाचा इसम सार्वजनिक ठिकाणी तलवार घेवुन धूमधाम करून शांतता भंग करीत आहे, अशा मिळालेल्या खबरेवरून पोलीस स्टेशन कन्हान येथील स्टाफ सहायक पोलीस निरीक्षक फुलझेले, पोलीस हवालदार मुदतसर, पोलीस नायक कुमरे, पोलीस शिपाई आकाश हे पंचनाम्यातील पंचासोबत आंबेडकर चौक कन्हान येथील आकाश पान पॅलेस एसबीआय एटीएम जवळ जावून पाहीले असता लोकांची गर्दी जमली होती व लोक भीती मुळे इकडे तिकडे पळत होते. आरोपी नामे विक्की क्रिष्ण उके, वय ३२ वर्ष, रा. जवाहर नगर कन्हान तह. पारशिवनी याची कन्हान पोलीसांनी अंगझडती घेतली असता एक लोखंडी धारदार टोकदार तलवार ज्याची एकूण लांबी ६७ सेमी व पाते ५० सेमी मुठ १७ सेमी व रूदी अशा वर्णनाची मिळुन आल्याने आरोपीला शस्त्र बाळगण्याबाबत परवाना विचारला असता कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याचे त्याने सांगितल्याने तो सार्वजनिक ठिकाणी अवैधरीत्या शस्त्र बाळगुन लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने फिरत असल्याचे दिसुन आले.
सदर प्रकरणी सरकारतर्फे नापोशि सचिन वेळेकर व नं. १८२८ पोस्टे कन्हान यांचे रिपोर्टवरुन पो स्टे कन्हान येथे आरोपीविरुध्द कलम ४, २५ भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. गुन्हयाचा पुढील तपास सहायक फौजदार गणेश पाल व नं. ३६० हे करीत आहेत..