मतदान करणाऱ्यांना मिळणार आझाद बगीच्यात मोफत प्रवेश

– मतदार चिठ्ठी मिळाली नसल्यास मनपाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करा

चंद्रपूर :- चंद्रपुर लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.या मतदानात मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनातर्फे SVEEP (Systematic Voter’s Education and Electoral Participation) अंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत असुन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे 19 एप्रिल रोजी जे नागरीक मतदान करतील,ज्यांच्या बोटाला शाई असेल त्यांना 19 व 20 एप्रिल रोजी आझाद बगीच्यात मोफत प्रवेश दिला जाणार आहे

13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात म्हणजे 19 एप्रिल 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत होणार आहे. या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध प्रयत्न प्रशासनामार्फत केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून नागरिकांच्या घरापर्यंत पोहचून ‘मतदार चिठ्ठी’ चे वाटप प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.या मतदार चिठ्ठीद्वारे आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करता येते तसेच मतदान केंद्र कुठे आहे याचीही माहिती मिळते.

या वाटपादरम्यान जर काही नागरिकांना मतदार चिट्ठी मिळाली नसेल तर त्यांना आपल्या बूथ लेव्हल ऑफिसरशी (बीएलओ) संपर्क करता येईल किंवा व्होटर हेल्पलाईन ॲपवर जाऊन व्होटर सर्विसेसमध्ये,नो युवर पोलिंग स्टेशन डिटेल्समध्ये जाऊन आपला व्होटींग कार्ड नंबर ( Epic Number ) टाकून माहिती करून घेता येईल. त्याचप्रमाणे https://electoralsearch.eci.gov.in/pollingstation या लिंकवर जावून माहिती करून घेता येईल किंवा चंद्रपूर

महानगरपालिकेच्या 18001237980 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करून मतदार चिठ्ठीबाबत माहिती घेता येईल.

तेव्हा सर्व नागरिकांनी १९ एप्रिल रोजी मतदान करून जागरूक नागरिकाचा हक्क बजावण्याचे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेद्वारे करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अवैध वाळू उपसा करणारी चार वाहने जप्त

Wed Apr 17 , 2024
– अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात जिल्हा भरारी पथकाची कारवाई – मागील वर्षात 2 कोटी 61 लाख दंड आकारणी – घरकुल योजनांसाठी गावालगतच्या नदी-नाल्यातून 5 ब्रास रेतीसाठी प्रस्ताव आमंत्रित गडचिरोली :- जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यातील गणपूर घाटावर अवैध वाळू उपसा करणारी चार वाहने काल जिल्हा भरारी पथकाने जप्त केली आहेत. अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांचे मार्गदर्शनात जिल्हा खनिकर्म अधिकारी बर्डे, मंडळ अधिकारी नवनाथ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com