व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पोलीस स्टेशन उप पोलीस स्टेशन येथील अधिकारी झाले सहभागी
गडचिरोली :- दिनांक २१ जून हा दिवस संपूर्ण जगामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यामध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्य साधारण महत्व आहे तसेच प्राचीन काळापासून ऋषीमुनी, साधुसंत यांनी वेळोवेळी योगाचे महत्व फायदे व त्याची गरज पटवून सांगीतले आहे. आजच्या काळातील धकाधकीच्या जीवनात योगासनाच्या माध्यमातून आपण आपले शरीर कसे तंदरुस्त ठेवता येईल, आपल्या तन-मनावर कसे चांगले संस्कार करता येईल याकरीता आज रोजी २१/०६/२०१३ रोजी ९ या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने गडचिरोली पोलीस मुख्यालय येथे सकाळी ५ ते ७ वाजतापर्यंत योग शिबीराचे आयोजन करण्यात आले.
सदर योग शिबीरामध्ये पोलीस अधीक्षक कार्यालय, पोलीस मुख्यालय, विशेष अभियान पथक प राज्य राखीव पोलीस दल येथील एकूण १००० च्या संख्येने अधिकारी व अमलदार उपस्थित होते. तसेच योग शिवीराम व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पोस्टे / उपपोस्टे / पोमके येथील सर्व अधिकारी / अंमलदार सुदा सहभागी झाले होते. या योग शिबीरामध्ये योगाचे शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक असे तीन प्रकार शिकवण्यात आले. तसेच या योग शिबीरामध्ये योगगुरु श्री. श्रीकृष्ण शेवाळे यांनी उपस्थित सर्व पोलीस अधिकारी / अंमलदार यांना योगासनाचे महत्व पटवून सांगीतले. यासोबतच योग कसा करावा, कोणती योगासने शरीराला आणि मनाला सशक्त व सक्षम ठेवू शकतात याविषयी मार्गदर्शन केले. तसेच पोलीसांना कामकाज परताना येणारे ताणतणाव योगासनाद्वारे कसे नियंत्रणात ठेवता येईल यासाठी विविध प्रकारची योगासने करून त्यांचे महत्व पटवून सांगीतले.
सदर योग शिबीरामध्ये पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे ,अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता तसेच नागपूर येथील योग मेडीटेशन मार्गदर्शक दिपक पटेल व मध्यभारत समर्पण आश्रम, चूड़ीयोरी नागपूर येथील योग मेडीटेशन योगगुरु श्रीकृष्ण शेवाळे हे उपस्थित होते.
सदर शिबीराच्या यशस्वीतेसाठी गडचिरोली पोलीस मुख्यालयाचे रापोनि विठ्ठल मुत्यमधार पोलीस कल्याण शाखेचे प्रभारी अधिकारी नरेंद्र पिचास, सायबर सेलचे प्रभारी अधिकारी निलेश वाप व इतर शाखा/पोस्टे/उपपोस्ट / पोमकचे प्रभारी अधिकारी / अमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.