फसवणूक करणाऱ्या आरोपींविरूध्द गुन्हा दाखल

नागपूर :- फिर्यादी साधना बंडु काटकर वय ४९ वर्ष रा. वार्ड क. ५, महादुला, कोराडी यांनी सन २०२२ मध्ये मिळालेल्या एका पत्रकाची जाहीरात ज्यामध्ये ओसीवन एजुकेशन सोसायटी, मोदी नं. ३, राहुल मार्केट, तिसरा माळा, सिताबडौँ, नागपूर येथे फी सिलाई मशीन मिळणार अशी जाहिरात वाचुन नमुद ठिकाणी दि. ०१.०१.२०२३ रोजी गेल्या असता तेथे ओसीयन फायनंस प्राय लिमी, या नावाचे ऑफीस होते. तेथील डायरेक्टर आरोपी क. १) सागर संजय खंडारे वय २८ वर्ष रा. प्लॉट नं. १०८, आनंद नगर, सक्करदरा, नागपूर याने फिर्यादीस ते त्यांचे ऑफीसचे माध्यमातुन गरजू लोकांना शासनाच्या विवीध योजनांचा लाभ मिळवुन देतात असे सांगुन फिर्यादीस त्यांचे साठी काम केल्यास घर बसल्या कमाईची संधी आहे असे सांगीतले. फिर्यादीनी होकार दिल्यावर आरोपीने त्यांना कोराडी विभागाचे फिल्ड एक्झीकेटीव्ह म्हणून नियुक्त केले. आरोपीने फिर्यादीस शासनाच्या वेग-वेगळया योजना ज्यामध्ये बेरोजगार, अटल पेंशन योजना, जुनी पेंशन योजना, सिलाई मशीन योजना, लक्ष्मी कल्याण योजना, प्रधानमंत्री आवास योजना यांचे फॉर्म दिले व ते फॉर्म गरजु लोकांकडुन भरून घेवुन प्रत्येक फॉर्म साठी वेग-वेगळया रक्कमा घेवुन फॉर्म व रक्कम आरोपीचे कार्यालयात त्यांची मॅनेजर आरोपी क. २) प्रियंका लाकेश सानप वय ३१ वर्ष रा. भेंडे ले-आउट, खामला, नागपूर हिचे कडे जमा करण्यास सांगीतले. फिर्यादीने जानेवरी २०२३ ते दि. ०४.०५.२०२३ पर्यंत बेरोजगार भत्ताने ८० फॉर्म प्रत्येकी १,०००/- रू प्रमाणे, अटल पेंशन योजना ५ फॉर्म प्रत्येकी ५००/- रु. आवास योजनेचे ३ फॉर्म प्रत्येकी ९५००/- रू. लक्ष्मी कल्याण योजनेचे १०० फॉर्म प्रत्येकी ५००/- रू, सिलाई मशीनचे २० फॉर्म प्रत्येकी ३,०००/- रू व ईतर मशीनचे १८ फॉर्म प्रत्येकी ८००/- रू प्रमाणे लोकांकडून घेवुन असे एकुण २,४४,०००/- रू टप्पा-टप्याने आरोपी व मॅनेजर यांचेकडे जमा केले. आरोपीने अशाच प्रकारे ईतर ०७ महिला यांना वेगवेगळ्या भागात फिल्ड एक्झीकेटीव्ह महणुन नियुक्त केले व त्यांचे कडुन सुध्दा योजनांचे फायदा देण्याचे आमीष दाखवुन एकुण ३५,१९,०००/- रू घेतले. आरोपींनी संगणमत करून गरजु लोकांकडून वेग-वेगळया योजनांचा फायदा देण्याचे आमीष दाखवून रक्कम व फॉर्म भरून घेवुन पावत्या दिल्या व कोणालाही कोणत्याही योजनेचा फायदा न देता व रक्कम परत न देता महिलांची एकुण ३५,१९,०००/- रू ची आर्थिक फसवणुक केली. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून व अर्जाचे चौकशीवरून पोलीस ठाणे सिताबर्डी येथे पोउपनि. दहाडे यांनी आरोपीविरूध्द कलम ४२०, ४०६, ३४ भा.द.वी. अन्वये गुन्हा दाखल केला असुन आरोपींचा शोध व पुढील तपास करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वाहन चोरी करणाऱ्या आरोपीस अटक, चार गुन्हे उघडकीस

Mon May 27 , 2024
नागपूर :-पोलीस ठाणे कोतवाली हद्‌दीत नाईक रोड, गजानन मंदीर जवळ, महाल, नागपुर, येथे राहणारे फिर्यादी आशिष अनंतराव रणदिवे वय ४१ वर्ष यांनी त्यांची पेंशन प्लस गाडी क. एम.एच ३१ सि.ई २०५० लाल काळया रंगाची किंमती १०,०००/- रू ची घरासमोर पार्क करून ठेवली असता, कोणीतरी अज्ञात आरोपीने फिर्यादीची गाडी चोरून नेली. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे कोतवाली येथे अज्ञात आरोपीविरूध्द […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com