‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियान २६ सप्टेंबरपासून

टास्क फोर्स समितीच्या बैठकमध्ये निर्णय : प्रत्येक झोन मध्ये आरोग्य शिबिर

नागपूर :-  राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीतील अठरा वर्षावरील महिला, माता, गरोदर स्त्रिया यांच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी नवरात्रि कालावधीत २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर दरम्यान “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियान राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत दहाही झोननिहाय विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहेत.

या अभियानाची अंमलबजावणी संदर्भात मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील आयुक्त सभाकक्षात मनपा अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स समितीची बैठक पार पडली. याप्रसंगी मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, शिक्षणाधिकारी राजेंद्र पुसेकर, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय जोशी, झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. भावना सोनकुसळे, डॉ. मेघा जैतकर, डॉ. प्रिती झाररीया, डॉ. वैभवी गभने, डॉ. शीतल वांदिले, डॉ. दीपंकर भिवगडे, डॉ. विनय कुमार तिवारी, सुरेन्द सरदारे, डॉ. वसुंधरा भोयर, डॉ. एस. के. धवड, डॉ. सुनील कांबळे, डॉ. अनुपमा मावळे, डॉ. अनिता भांबर्डे, यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी अभियानाचे स्वरूप कसे राहील याची माहिती दिली तर मनपा अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी अठरा वर्षावरील सर्व महिला माता, गरोदर स्त्रिया यांची आरोग्य तपासणी सोबतच प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा या शिबिरात उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. याशिवाय प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर नवरात्र कालावधीत दररोज माता व महिलांच्या तपासणीची शिबिरे घेण्यात यावीत, यात वैदयकिय अधिकारी यांनी स्वतः मातांची तपासणी करावी. आजारी महिलांना उपचार व आवश्यकतेनुसार मदत देण्यात यावी. झोन निहाय तज्ञांची शिबिरे जास्तीत जास्त आयोजित करून नागरिकांना तज्ञसेवा उपलब्ध करुन द्यावी असे निर्देश दिले. तर सुरक्षित व सुदृढ आरोग्यसाठी समुपदेशन करण्यात यावे असेही सांगितले. तसेच  राम जोशी यांनी उपक्रमांचा अधिकाधिक महिलांनी लाभ घ्यावा यासाठी आरोग्य सेविका व सेवक, झोन वैद्यकीय अधिकारी यांनी घरोघरी जाऊन शिबिराबाबत माहिती देत झोन निहाय विशेष सभांद्वारे जनजागृती करण्याचे निर्देश दिले. सर्व प्राथामिक आरोग्य केन्द्राची लोकेशन गूगल मॅप वर उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच नवरात्रिच्या पंडालमध्ये सुध्दा आरोग्य तपासणिची व्यवस्था मनपा तर्फे केली जाणार आहे.

वैदयकिय अधिकारी यांची विशेष शिबिरे

‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियानांतर्गत विशेष आरोग्य तपासणी शिबिरे घेण्यात येणार आहे. यात महिला व मातांची वैदयकिय अधिकारी यांच्या मार्फत तपासणी केल्या जाणार असून, वजन व उंची घेवून BMI काढणे ( सर्व स्तरावर ) Hb % , Urine Examination , Blood Sugar ( सर्व स्तरावर ग्रामपातळीपासुन ), प्रत्येक स्तरावर HLL मार्फत व संस्था स्तरावर उपलब्ध सर्व रक्त तपासण्या Urine Examination , Blood Sugar ( आवश्यकतेनुसार व महिलांच्या वयोगटानुसार ) केल्या जाणार आहेत. याशिवाय Chest X Ray, कर्करोग स्क्रिनिंग, रक्तदाब स्क्रिनिंग, मधुमेह स्क्रिनिंग ( ३० वर्षावरील सर्व महिला ), RTI – STI ची तपासणी,माता व बालकांचे लसीकरण केल्या जाणार आहे.

मनपाच्या ३४ UPHC मध्ये शिबिरे

लक्ष्मीनगर झोन

जामठा युपीएचसी

सोमलवाडा युपीएचसी

फुटाळा युपीएचसी

धरमपेठ झोन

हजारीपहाड युपीएचसी

तेलंगखेडी युपीएचसी

के. टी. नगर युपीएचसी

हनुमाननगर झोन

नरसाळा युपीएचसी

मानेवाड़ा युपीएचसी

धंतोली झोन

बाबुलखेडा युपीएचसी

कॉटन मार्केट युपीएचसी

नंदनवन युपीएचसी

नेहरूनगर झोन

बेबीपेठ युपीएचसी

ताजबाग एचपी

दीघोरी एचपी

गांधीबाग झोन

मोमीनपुरा युपीएचसी

भादलपुरा युपीएचसी

शांतीनगर संतरजीपुरा झोन

मेहंदीबाग युपीएचसी

जागनाथ बुधवारी युपीएचसी

सतरंजीपुरा युपीएचसी

लकंडगंज झोन –

डिप्टी  सिंगल युपीएचसी

पारडी युपीएचसी

वीजयनगर (भरतवाडा) युपीएचसी

हिवरीनगर युपीएचसी

आशीनगर झोन

कपीलनगर युपीएचसी

पाचपोळी युपीएचसी

शेंडेनगर युपीएचसी

गरीबनवाज एचपी

भांडेनवाज एचपी

मंगळवारी झोन

झिंगाबाई टाकळी युपीएएचसी

इंदोरा युपीएचसी

गोरेवाडा युपीएचसी

नारा युपीएचसी

एनएमएच हॉस्पीटल

याशिवाय 

इंदीरा गांधी रुग्णालय

पाचपावली प्रसूतीगृह

आयसोलेशन हॉस्पीटल

NewsToday24x7

Next Post

"एक वार्ड एक नगरसेवक" रिपब्लिकन आघाडी लोकशाही मोर्चाचे कमाल चौकातुन स्वाक्षरी अभियानाला सुरूवात

Sun Sep 25 , 2022
नागपूर :- रिपब्लिकन आघाडी लोकशाही मोर्चाच्या वतीने “एक वार्ड एक नगरसेवक” अभियान अंतर्गत नागरिकांच्या सह्या जमा करण्यात आल्या. 13 सप्टेंबरला दुपारी 4 वाजता कमाल चौक इंदोरा येथून या अभियानाची सुरुवात झाली पायवाट जानारे, सायकल, सायकल रिक्षा, ईरिक्षा, अॅटोरिक्षा, कार मॅटॅडोर, बसवाले नागरिकांनी सहया करण्यासाठी हिरिरिने भाग घेवुन सुरुवात करण्यात आली  अनेक नागरीक प्रभाग पद्धतीचा विरोधात रोष व्यक्त करतांना आढळले. त्यांचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com