प्राणांकीत अपघात करणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल

नागपूर :-दिनांक १६.०५.२०२३ चे ००.३० वा. सुमारास पोलीस ठाणे वाठोडा हद्दीत हैदराबाद-जबलपूर हायवे रोड ओरिएंटल कंपनीच्या समोर, पारणा गावाचे टर्निंग पॉईन्टवरून ज्ञानेश्वर हरिश्चंद्र निदान वय ५६ वर्ष रा. आसोली, नागपूर हे आपले मोटरसायकल के. एम. एच. ४० ए.एफ ८४६४ ने जात असता अज्ञात वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून मोटरसायकलला मागुन धडक दिल्याने ज्ञानेश्वर यांचे डोक्याला मार लागल्याने गंभीर जख्मी होवुन बेशुद्ध झाले. पोलीसांनी त्यांना उपचाराकरीता मेडीकल हॉस्पीटल मध्ये दाखल केले असता उपचारा दरम्यान डॉक्टरांनी सकाळी ०९.३० वा. तपासून मृत घोषीत केले.. याप्रकरणी फिर्यादी सरकार तर्फे नापोअं, फारूख अली सैय्यद अली पोलीस ठाणे वाठोडा  तक्रारीवरून पोलीस ठाणे वाठोडा येथे पोउपनि यदी यांनी अज्ञात आरोपी वाहन चालकावि २७९, ३३८, ४२७, भा.द.वी सहकलम १३४, १७७, मो. वा. का अन्वये गुन्हा दाखल करून कलम ३०४(अ).वाढ करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वच्छ भारत अभियान : शोध पथकाची कारवाई

Wed May 17 , 2023
नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवार ता.17) 7 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 55 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सी. के. कन्संल्टन्सी, धंतोली, नागपूर यांच्यावर न्यूरॉन हॉस्पिटल पुलाजवळ बांधकाम साहित्यचा कचरा टाकल्याबाबत 5 हजार दंड वसूल करण्यात आला. तसेच अजिंक्य प्लाझा, गोकुलपेठ नागपूर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!