30 वर्षीय मतिमंद तरुणीवर लैंगिक अत्याचार..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 9 :- स्थानिक जुनी कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जुनी खलाशी लाईन, कादर झेंडा रहिवासी एका 30 वर्षीय तरुणीवर आरोपीने पीडित मानसिक दृष्ट्या कमजोर असल्याचा फायदा घेत वेगवेगळ्या ठिकाणी लैंगिक अत्याचार केल्याची घटना 1 फेब्रुवारी 2023 ते 6 मे 2023 या कालावधीत घडली असून यासंदर्भात फिर्यादी पीडित मतिमंद तरुणीच्या आईने स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध भादवी कलम 376,376(2)(1)एल 354 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर पीडित तरुणी ही मतिमंद असल्याच्या फायदा घेत अनोळखी आरोपीनी तिच्या मानसिक दृष्टया कमजोरी चा फायदा घेत तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले तर आज या पीडित तरुणीच्या पोटाला कळा गेल्याने पोट खूप दुखत असल्याने पीडित तरुणीच्या आईने संशय बळकावला ज्यावर कदाचित तिला गर्भधारणा झाली असा आरोप करण्यात येत आहे त्यानुसार जुनी कामठी पोलीस स्टेशन ला तक्रार नोंदवली आहे .फिर्यादी ने पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अनोळखी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील आरोपीचा शोध घेण्याला पोलिसांनी तपासगती दिली आहे तर वैद्यकीय अहवालानुसार पुढील कारवाही करण्यात येणार आहे .

@फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

क्रेडाई मेट्रोच्या समस्यांसंदर्भात मनपामध्ये बैठक

Wed May 10 , 2023
संदीप जोशी यांच्या उपस्थितीत मनपा, जिल्हाधिकारी, नागपूर मेट्रो रिजनची बैठक नागपूर :- क्रेडाई नागपूर मेट्रोच्या संदर्भातील विविध समस्यांच्या अनुषंगाने नागपूर महानगरपालिकेमध्ये मंगळवारी (ता.९) मनपा, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर मेट्रो रिजन यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. नागपूर महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमधील आयुक्त सभागृहामध्ये ही बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर कार्यालयाचे मानद सचिव माजी महापौर संदीप जोशी यांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!